Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, भुजबळांनी सांगितली आतली गोष्ट

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, भुजबळांनी सांगितली आतली गोष्ट
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 4:09 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला रंगत आली असून, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी देशाचे प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती काम करत आहे. मोदींविरोधात खूप राळ उठवण्यात आली, मात्र पुन्हा ते पंतप्रधान झाले, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती काम करत आहे. मोदींविरोधात खूप राळ उठवली, मात्र पुन्हा ते पंतप्रधान झाले. जगभरात त्यांचा नावलौकिक होत आहे.युद्ध थांबवायला मदत करा, अशी देखील त्यांना विनंती करण्यात येते. भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची झाली आहे.  सबका साथ सबका विकास अशी घोषणा त्यांनी केली. देशातील गरजूंना अन्नधान्य पुरवठा केला जात आहे.  २०२९ पर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. लोकांसाठी जनआवास योजना, जलजीवन मिशन अशा योजना दिल्या. ओबीसींना घरं दिली, आदिवासींसाठी योजना पारधींसाठी आवास योजना आहेत. मागच्या कॅबिनेटमध्ये ठरलंय आपण सरसकट अडीच लाखांपर्यंत मदत करणार आहोत. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पोहोचवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे.  नळाला पाणी मिळणार आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले? 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अनेकांनी सांगितलं पैसे येणार नाही, मात्र मिळाले की नाही लाडक्या बहिणींना पैसे असा सवाल यावेळी भुजबळांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  दीड हजारांचे आता २१०० देणार आहोत. पुढेही ते वाढत जातील.  रस्त्याचा विकास झाला आहे, समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत पूर्ण होणार आहे. नाशिकमध्ये आपण १४-१५ उमेदवार उभे केले आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते नाशिकमध्ये बोलत होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.