एक टन वजनाच्या हाराने धनंजय मुंडेंचं जन्मगावी स्वागत, मुंडेंच्या आईंना अश्रू अनावर
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्कारासारखी गंभीर तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर मुंडे यांचं जागोजागी जंगी स्वागत करण्यात येत आहे.
बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्कारासारखी गंभीर तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर मुंडे यांचं जागोजागी जंगी स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, आरोपांमधून मुक्त झाल्यानंतर धनंजय मुंडे आज पहिल्यांदाच त्यांच्या मूळ गावी नाथ्रा येथे गेले असता त्यांची जंगी स्वागत करण्यात आलं. मुंडे यांच्यावर यावेळी तब्बल एक टन वाजनाच्या फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आलं. हे दृष्य पाहताना त्यांच्या आई रूक्मिणीबाई यांना अश्रू अनावर झाले होते. हे पाहताना मुंडे यांचे कार्यकर्तेदेखील गहिवरले होते. दरम्यान, मुंडे यांच्या स्वागताला त्यांच संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
व्हिडीओ पाहा
जेसीबीतून फुलांची उधळण
प्रजासत्ताक दिनी धनंजय मुंडे जेव्हा शिरुर कासार इथं दाखल झाले होते त्यावेळी त्यांच्यावर जेसीबी मशीनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. त्याचबरोबर एक भला मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालण्यात आला. कार्यकर्त्यांकडून झालेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे धनंजय मुंडे भारावल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.
..तरी उपकार फिटणार नाहीत : मुंडे
‘तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. हे आशीर्वाद म्हणजे एखाद्या भगवंताचा प्रसादच आहे. अशा कठीण काळात आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिलात. त्याबद्दल मी शब्दात आभार व्यक्त करु शकत नाही. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली होती. आजपर्यंत अनेक संकटाला सामोरा गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे,’ अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले होते.
संबंधित बातम्या
धनंजय मुंडेंच्या ‘परस्पर संबंधा’वर पंकजांनी मौन सोडलं, म्हणाल्या..
धनंजय मुंडेंना ‘परस्पर संबंधावर’ पंकजांचा पाठिंबा नाहीच!; भाजपलाही फटकारले?
(big Welcome ofDhananjay Munde’s birthplace Nathra Village)