Bill Gates | चक्क अब्जाधीश बिल गेट्स ‘चाय पे चर्चा’ करतात तो नागपूरकर ‘डॉली चहावाला’ कोण?
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांना ओळखत नाही असा माणूस विरळाच. पायाशी सर्व सुखांनी घेतलेली लोळण, प्रचंड संपत्ती असूनही बिल गेट्स यांचा साधेपणा सर्वांना ठाऊक आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या अब्जाधीश बिल गेट्स यांना एका चहावाल्याची भुरळ पडली

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांना ओळखत नाही असा माणूस विरळाच. पायाशी सर्व सुखांनी घेतलेली लोळण, प्रचंड संपत्ती असूनही बिल गेट्स यांचा साधेपणा सर्वांना ठाऊक आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या अब्जाधीश बिल गेट्स यांना एका चहावाल्याची भुरळ पडली आहे. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हटके चाय बनवणाऱ्या डॉलीच्या स्टाईलची पडली भुरळ
बिल गेट्स यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिल गेट्स हे डॉली चायवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या चहा विक्रेत्याच्या स्टॉलवर असून , ते त्याच्या हातच्या खास चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यांच्या या ‘चाय पे चर्चा’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
वन चाय प्लिज, व्हिडीओ व्हायरल
नागपूरमधील सदर परिसरातील ‘डॉली चहावाला’फेमस आहे. त्याचे सोशल मीडियावरही असंख्य फॅन्स असून चहा बनवण्याच्या त्याच्या हटके अंदाजामुळे त्याचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. त्याच्याबद्दल समजल्यानंतर त्याच्या स्टाईलचा चहा पिण्यासाठी बिल गेट्स यांनी त्याला हिल स्टेशनवर निमंत्रण दिले. आणि त्याचा व्हिडीओही पोस्ट केला. त्यांनी या खास चहाची चुस्कीही घेतली.. वन चाय प्लिज असं बिल गेट्स व्हिडीओच्या सुरूवातीला म्हणताना दिसत आहेत. डॉली चहावाल्याची चहा बनवण्याची स्टाईल, त्याची प्रत्येक कृती बिल गेट्स कौतुकाने पाहताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमामात व्हायरल झाला असून बिल गेट्स यांना सर्वसामान्यांप्रमाणे चहा पिचाना पाहून अनेकां सुखद धक्का बसला.