मुंबई महापालिकेची रणनीती आज ठरणार! युतीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आणखी कोणते पक्ष?

महानगर पालिकेच्या निवडणुका लढवत असतांना काय रणनीती असावी यासाठी आज होणाऱ्या बैठकीत खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांचीही उपस्थिती असणार आहे.

मुंबई महापालिकेची रणनीती आज ठरणार! युतीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आणखी कोणते पक्ष?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 1:14 PM

गिरीश गायकवाड, मुंबई : महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळसाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाची आज मुंबई येथे बैठक होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जय्यत तयारी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सह्याद्री अथितिगृहात मुंबईतील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसदर्भात रणनिती ठरवील जाणार आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष येणारी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार यांचे स्पष्टं संकेत यानिमित्ताने दिसून येत आहे. या युतीत आणखी कुणाला सहभागी करायचे, यावरही चर्चा होणार आहे. अन्न मराठा संघटनांना सोबत घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे.

येत्या काळात येणाऱ्या निवडणुका बघता भाजप आणि बाळसाहेबांची शिवसेना यांच्या युतीकडून एकत्रित निवडणुका लढविल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीत कुणाला सहभागी करून घ्यायचे याबाबत आज होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना फूटीनंतर होणारी मुंबई महानगर पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने शिंदे गटासाठी आणि भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.

महानगर पालिकेच्या निवडणुका लढवत असतांना काय रणनीती असावी यासाठी आज होणाऱ्या बैठकीत खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांचीही उपस्थिती असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडत आहे.

त्यामुळ भाजप आणि बाळासाहेबांच्या बैठकीत युतीत आणखी कोण सहभागी होणार आहे ? एकत्रित निवडणुकांचे जागा वाटप कसे होणार आहे ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.