विजय वड्डेटीवारांच्या नावाने ‘शंखनाद’; साधूसंत नाशिकच्या रामकुंडावर एकवटले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झोप कशी लागते? असा सवाल आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे. (BJP Andolan against Vijay Wadettiwar statement)
नाशिक : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच साधूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज रामकुंड, पंचवटी येथे साधू-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन पार पडले. “आपला सहकारी मंत्री साधूंना नालायक म्हणतो, अशावेळी हिंदूह्रदयसम्राटांचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झोप कशी लागते?” असा सवाल आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला. (BJP Andolan against Vijay Wadettiwar statement)
जनाब उद्धव मिया ठाकरेंच्या मुघल विकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ महिलांवर अत्याचार करते. हिंदु समाजाचा अपमान, मुलांना डांबून ठेवते, साधूंना शिव्या घालतात अशा रावणालाही लाजवेल अशा स्वैराचारी मुघल विकास आघाडी सरकारचे लवकरच रामकुंडात विसर्जन होईल. त्यानंतर महाराष्ट्रात रामराज्य यावे याकरिता साधू-संतांनी शंखनाद केला आहे, असेही तुषार भोसले म्हणाले.
जैन साधू परंपरेचा देखील हा अपमान
साधूंचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. साधूंच्या वेशातल्या 2-4 भोंदूंनी गैरवर्तन केले, म्हणून हिंदु समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करुन साधना करत असलेल्या साधू परंपरेला अशा शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधू परंपरेचा देखील हा अपमान आहे. हिंदूविरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे, अशी टीकाही भोसले यांनी केली.
वडेट्टीवार यांच्या साधूंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दलच हे शंकानाद आंदोलन छेडण्यात आले आहे असे ते म्हणाले. यावेळी कार्यकत्यांनी आपल्या हातात “साधूंना नालायक म्हणतो वडेट्टीवार, उध्दवा अजब तुझे सरकार”, “याजसाठी केला होता मुख्यमंत्री पदाचा अट्टहास? हिंदुंचा आणि साधूंचा करता येईल उपहास !” अशा प्रकारचे फलक घेत निषेध आंदोलन केले.
“हिंदू समाजाला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?”
हिंदू समाजाला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का? 15 डिसेंबर 2020 रोजी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की, “हा महाराष्ट्र साधू-संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही”. मग तुमचेच मंत्री आज साधूंना नालायक म्हणतात हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का ? तुमचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात, शरजील सारखी विकृती इथे येऊन हिंदूंना शिव्या घालून जाते, आता तर तुमचे मंत्रीच साधूंना शिव्या देतात. तुमचे असे मंत्रिमंडळ पाहून तर हे रावणाच्या मंत्री मंडळाला लाजवेल असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे असेच म्हणावे लागेल, असेही तुषार भोसलेंनी म्हटले. (BJP Andolan against Vijay Wadettiwar statement)
संबंधित बातम्या :
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ओबीसी उत्पन्न मर्यादा अडीच लाख करा; नितीन राऊतांची मागणी