गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू, तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा

दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाषणात केला.

गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू, तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा
भाजपच्या आझाद मैदानावरील मोर्चात भाषण करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 2:32 PM

मुंबईः दाऊदशी संबंधित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करण्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. आज मुंबई येथील आझाद मैदानावर भाजप समर्थकांनी विराट मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आशीष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. दाऊदच्या दबावाला बळी पडून हे सरकार नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीये. त्यांना पाठिशी घालत आहे. दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाषणात केला.

‘दाऊदच्या दबावापुढे दबणारं सरकार’

महाराष्ट्र सरकारवर दाऊदचा दबाव आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्रात 27 महिन्यात पूजा चव्हाणमध्ये संजय राठोडांचा राजीनामा झाला. केवळ जनतेने आवाज उठवला आणि संवेदनशीलता दाखवून राजीनामा घेतला गेला. अनिल देशमुखांच्या बाबतीत हायकोर्टानं सीबीआय चौकशीचा आदेश दिला. त्यांचाही राजीनामा घेतला गेला. मात्र नवाब मलिकांच्या बाबतीत असं का झालं नाही? नवाब मलिकांना कोठडी दिली तेव्हा दिल्लीचं नाव घेतलं गेलं. पण कोर्टानं कोठडी दिली. दाऊदच्या दबावाला दबून राज्य करणाऱ्यांविरोधात हा संघर्ष आहे. नवाब मलिकाचा पुतळा जाळणं, राजीनाम्याची मागणी करणं, यासाठी आंदोलनं झाले. विधानसभा सुरु असल्यामुळे एवढा मोठा आंदोलन सुरु आहे. ज्यांनी राजीनामा घ्यायचा असतो, ते पवार साहेब आणि ज्यांनी सांगितल्यामुळे राजीनामा घ्यायचा असतो, ते पवार साहेब या दोघांना इशारा देण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

यह तो एक अंगडाई हे आगे और लडाई है….

नवाब मलिका यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपचं हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा पाटील यांनी दिला. ते म्हणाले, ‘यह तो एक अंगडाई हे आगे और लडाई है, महाराष्ट्राच्या गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू. तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू. दाऊदशी तुमचं नाव जोडलं गेलंय. दाऊदला मदत करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याासठी सरकारची धडपड आहे. यांना शेतकऱ्यांची चिंता नाहीये. वीजेची कनेक्शन कापली जात आहेत. पिकं जळून जात आहेत. परीक्षांचे पेपर हुकतायत. त्याचं नाही नाही. यांना मलिकांना वाचवायचंय, देवेंद्रजी संघर्ष करो… हम तुम्हारे साथ है… अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप दिवसेंदिवस आक्रमक होत असतानाच मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनीही दिलं आहे.

इतर बातम्या-

Viral : ‘रासोडे में कौन था’नंतर आता ‘खाली छोरी पटाता है’नं घातलाय धुमाकूळ, 82 लाखांहून जास्त व्ह्यूज; पाहा ‘हा’ Video

VIDEO : BJP Andolan | भाजप कार्यकर्ते Azad Maidan दाखल, भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.