महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी? मुंबई उपनगरातील शिंदे गटाच्या जागेवर भाजपचा दावा, उमेदवारही तयार

आता महायुतीत शिंदे गटाच्या एका जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे.

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी? मुंबई उपनगरातील शिंदे गटाच्या जागेवर भाजपचा दावा, उमेदवारही तयार
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 5:48 PM

BJP On Jogeshwari East Assembly Constituency : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यातच आता अनेक पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरु झाले आहे. त्यातच आता महायुतीत शिंदे गटाच्या एका जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दावा केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका उज्वला मोडक यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.

उज्वला मोडक यांनी केला दावा

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी विधानसभेवर दावा केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका उज्वला मोडक यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उज्वला मोडक यांनी देवेंद्र फडणवीसांना एक पत्र दिले. या पत्रात त्यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. भाजपने जोगेश्वरी पूर्वची जागा लढवल्यास या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होईल. पण जर शिवसेनेला ही जागा सोडली तर या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होणं अशक्य आहे, असे उज्वला मोडक यांनी पत्रात म्हटले आहे.

“जोगेश्वरी विधानसभा भाजपचं जिंकू शकते” कार्यकर्त्यांचा दावा

रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र आता रवींद्र वायकर हे खासदार झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. आता भाजपने या जागेवर दावा केला आहे. माजी नगरसेविका उज्वला मोडक आणि रवींद्र वायकर हे जुने विरोधक आहेत. तरीही लोकसभेत निवडून येण्यासाठी भाजपने वायकरांना मोठी मदत केली आहे. त्यानंतर आता विधानसभेत जोगेश्वरी विधानसभा भाजपचं जिंकू शकते, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत वायकरांना मदत केली आता करणार नाही, अशी भूमिका स्थानिक भाजपने घेतली आहे.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा नक्की कोणाच्या पारड्यात जाणार?

भाजपने जोगेश्वरी विधानसभेवर दावा करत ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. यात यंदाचा आमदार भाजपचा कमळ फुलणार असे पोस्टरवर लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे आता महायुतीत जोगेश्वरी पूर्व विधानसभा नक्की कोणाच्या पारड्यात जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.