3 जागांचा तिढा सुटता सुटेना..मुंबईत भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक

भाजपच्या मुंबईतील लोकसभेच्या तीन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे

3 जागांचा तिढा सुटता सुटेना..मुंबईत भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 9:21 AM

मुंबई | 19 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि राजकीय पक्षांच्या तयारीला जोर आला. अबकी बार 400 पार म्हणत भाजपने तयारी सुरू केली आहे, तर इंडिया आघाडीने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र असं असलं तरी भाजपच्या मुंबईतील लोकसभेच्या तीन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १ वाजता रंगशारदा सभागृहात मुंबई भाजपची महत्वाची बैठक होणार आहे.

दिल्ली असो किंवा मुंबई, भाजपच्या बैठकांचे सत्र हे सुरूच आहे. मुंबईतील लोकसभेच्या तीन जागांचा तिढा जो आहे, तो अद्यापही कायम आहे. त्यावरच तोडगा काढण्यासाठी भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची बैठक आज बोलावण्यात आली आहे. आशिष शेलार यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे.  सर्व आमदार आणि खासदार यांना या बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतील तीन जागांबाबत अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यासाठी रोज नवनवीन चेहऱ्यांची चर्चा होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.

मिशन सहा हे भाजपचे मिशन असून मुंबईतील सहाही जागा भाजपला जिंकून आणायच्या असून, त्यासाठीच गेल्या काही काळापासून बैठकांचे सत्र वारंवार सुरू आहे. आजच्या बैठकीत आता त्या तीन जागांसाठी काय विचार होतो, काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.