Nawab Malik Arrest :नाही तर तुझ्या हातात विडी देतील, मलिकांवर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया

| Updated on: Feb 23, 2022 | 4:11 PM

या कारवाईवर बोलताना, आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे. मात्र ईडीच्या ताब्यातून झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे अशी घोषणा नवाब मलिक यांनी केली आहे.

Nawab Malik Arrest :नाही तर तुझ्या हातात विडी देतील, मलिकांवर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया
नवाब मलिकांवर राणेंची खोचक प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेने राजकारण जोरदार तापलं आहे. दोन्ही बाजुचे नेते एकमेकांवर तुटून पडत आहेत. अशात आता केंदीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) कसे गप्प बसतील. त्यांनीही खोचक प्रतिक्रिया देत नवाब मलिक यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. आज पाहटेपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्र नवाब मलिक यांची चौकशी सुरू होती. त्यांना दुपारी ईडीने (ED) अटक केली. त्यानंतर या कारवाईवर बोलताना, आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे. मात्र ईडीच्या ताब्यातून झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे अशी घोषणा नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपच्या काही नेत्यांनी तर नवाब मलिक यांचा संबंध थेट टी गँगशी आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकारणात मोठा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

हे तर होणारच होतं

नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, हे होणारच होते.मंत्री मंडळात डी काय आणखी भरपूर कंपनीची माणसे आहेत. असे सूचक विधान केले आहे. तर ईडी समोर आता बोल म्हणावं नायतर तुझ्या हातात विडी देतील, असा टोलाही राणेंनी लगावला आहे. त्यामुळे यावरून आता जोरदार राजकीय खडाखडी सुरू झाली आहे. नवाब मलिक यांचा संबंध डी गँगशी असल तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी शंका चंद्रकांत पाटील यांनीही उपस्थित केली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जुनी प्रकरण उकरून काढून भाजप सुडाच्या भावनेतून ही कारवाई घडवून आणत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे.

मलिकांपुढे पुढचा पर्याय काय?

 

मलिकांचा राजीनामा घ्या-पाटील

नवाब मलिक यांना ed ने अटक केलायंनातर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. नवाब मलिक यांची देहबोली म्हणजे गिरा तो भी टांग उपर अशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील एक मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी राजीनामा द्यावा लागला, एक आत आहेत, एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला, एका नेत्याचे अनधिकृत रिसॉर्ट आहे, एका मंत्र्याला दोन पत्नी आहेत. किती मोठी यादी आहे. काय चाललंय हे? कोलमडले आहे सगळं, अशी खोचक प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.

Nawab Malik : झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंंगे, ईडीच्या ताब्यातून नवाब मलिकांचा एल्गार

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

नोटीस न देता मलिकांच्या ED चौकशीला गृहमंत्र्यांचा आक्षेप; कायदा काय म्हणतो, सांगताहेत उज्ज्वल निकम…