शिवाजीपार्क गोठवलं का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
शिवाजीपार्क गोठवलं का?, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं
मुंबई : दसरा मेळावा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतील महत्वाची बाब आहे. दसरा मेळावा म्हणजे ठाकरेंनी विरोधकांवर डागलेली तोफ… पण यंदाचा दसरा मेळावा कुठे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेगट मोठा प्लॅन आखत आहे. कारण ठाकरेंच्या सभांचं केंद्रबिंदु असणारं शिवाजी पार्क गोठवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) घेण्यापासून रोखण्याचा शिंदेंचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतंही मैदान गोठवलेलं नाही, असं फडणवीस म्हणालेत.