भाजपला मनसेची गरज नाही, आठवलेंनीच ठरवले, शिवसेनेवरही मोठं विधान

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप मनसे एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच आज आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मात्र भाजपला मनसेची आवश्यकता नसल्याचे विधान केले आहे.

भाजपला मनसेची गरज नाही, आठवलेंनीच ठरवले, शिवसेनेवरही मोठं विधान
रामदास आठवलेंनी पुन्हा महाविकास आघाडीला डिवचलं
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 7:26 AM

मुंबई – मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप (bjp) मनसे (mns)एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असताना त्यात खोडा घालण्याचं रामदास आठवले (ramdas athawale) यांनी केलं आहे. ते म्हणतात की, आम्हाला मनसेची आवश्यकता नाही. रामदास आठवले यांनी असं वक्तव्य का केलं असावं असा प्रश्न अनेक राजकीय लोकांना पडला असेल तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील असा प्रश्न पडला असेल. सध्या रामदास आठवले हे पंढरपूर दौर्यावर आहेत, तिथं त्याच्याशी संवाद साधला असता, त्यांना मुंबई महापालिकेतील निवडणुकीविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर त्यांनी अजूनतरी तसा आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आला नसून आम्हाला मनसेची गरज नाही. रामदास आठवले अशी अनेक हास्यास्पद वक्तव्यं नेहमी करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. परंतु काल पंढरपूर दौ-यावर असताना केलेल्या व्यक्तव्याची दिवसभर चर्चा होती. मनसे आठवलेंना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आरोप-प्रत्यारोप निवडणुकीत फायदा कोणाला

मुंबई महापालिकेची निवडणुक कधीही होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. कारण कोरोनाचं कारण देत आत्तापर्यंत नियमावलीचं पालन करून निवडणुक होईल असं वाटतं होतं. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रात कमी असून निवडणूक लवकरचं होईल अशी चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबर मुंबईत सध्या सुरू असलेली आंदोलन आणि आरोप-प्रत्यारोप याचा फायदा राजकीय लोकांना किती होईल हेही पाहणं गरजेचं आहे. कारण मुंबईतलं राजकीय वातावरणं अधिक तापल्याचं आपण काल पाहिलं आहे. पोलिसांनी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांवरच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई केल्याचं पाहायला मिळालं. सध्या महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महानगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात कधी येईल यासाठी भाजपकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत.

आठवले काय म्हणाले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप मनसे एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच आज आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मात्र भाजपला मनसेची आवश्यकता नसल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज पंढरपूर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप- मनसे यांची युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. भाजप सोबत आरपीआय असल्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेला हरवणे फार अवघड नाही. पालिका निवडणुकीत भाजप 120 पेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत येणार आहे.संजय राऊत यांच्या टिकेमुळे शिवसेनेवरच निगेटीव परिणाम होत आहे.ईडी , सीबीआय, चा उपयोग संजय राऊत आणि मंत्र्यांच्या विरूध्द करुन सरकार पडेल असा काही विषय नाही अंतर्गत मतभेदामुळेच हे सरकार आपोआप पडेल असे ही मंत्री आठवले यांनी सांगितले.

वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाची थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लाखापर्यंत वाढवली; मंत्री विजय वडेट्टीवारांनी गरजूना केले आवाहन

भाजपचे ‘साडेतीन’ कोण? ED-CBI लाही उत्तर ऐकण्याचं राऊतांचं आवाहन, शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची वेळ काय?

CCTV | कार पार्किंगवरुन बाचाबाची, मुरबाडमध्ये डॉक्टरवर कोयत्याने हल्ला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.