अमरावतीत ‘मिनी बांगलादेश’? किती लोकांना मिळालं नागरिकत्व; किरीट सोमय्या यांच्या खळबळजनक आरोपाने सर्वच हादरले
मालेगाव आणि अमरावतीमध्ये व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न आहे. हा महा घोटाळा आहे,आचारसंहिताच्या वेळी या घोटाळ्यावर कोणीही लक्ष दिलं नव्हतं. आता आपण लक्ष दिलं आणि हा घोटाळा बाहेर आला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बनावट जन्मदाखले देऊन त्यांना आधारकार्ड देऊन त्यांचा समावेश मतदार यादी केल्याचा आरोप मध्यंतरी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी करीत खळबळ उडून दिली होती. त्यानंतर राज्यसरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली होती. आता अमरावतीत देखील अशा प्रकारे बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्मदाखले देऊन मतदार केल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मालेगावातील 1000 हून अधिक बांगलादेशातील नागरिक आणि रोहिंग्या मुस्लीमांना बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप भाजपाच नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर राज्यसरकारने त्याची दखल करीत एसआयटीची घोषणा केली होती. आता अमरावतीत देखील अशाच प्रकारे व्होट जिहादसाठी आपल्या विचारांचे सरकार येण्यासाठी मतदार संख्या वाढविण्यात केल्याचा आरोप करीट सोमय्या यांनी आज केला आहे. अमरावती जिल्हा प्रशासन अंजनगाव सुर्जी तहसिलला एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात आणावे असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. तहसीलमध्ये राहणार्या 1,100 बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांवर आधारीत जन्म दाखले दिल्याच्या आरोप करणाऱ्या तक्रारीची चौकशी करावी असे जिल्हा प्रशासानाने आदेश देत या प्रकरणी गुरुवारी एका समितीची स्थापना केली आहे.
बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा
या समितीचे अध्यक्षपद दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे असणार आहे. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी आणि मुख्य अधिकारी हे समितीचे सदस्य असणार आहेत. या प्रकरणातील समितीला तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेल्या पत्रात मालेगावसह अमरावतीतही बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे. दरम्यान अंजनगाव सुर्जी तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या कार्यालयाने एका वर्षात एकूण 569 जन्म प्रमाणपत्रे (485 मुस्लिम आणि 84 हिंदू ) जारी केली आहेत.सुमारे 1000 अर्ज अद्यापही छाननी अभावी प्रलंबित आहेत आणि त्यांची छाननी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र देणे म्हणजे भारतीय नागरिकत्व देण्याचे काम अंजनगावमध्ये झाले आहे. मालेगावमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला होता, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी नेमली होती. ८ तारखेला मी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती.आज आपण अमरावती दौरा केला. अमरावती जिल्ह्याचे आकडे माझ्याकडे आले आहेत ते चिंताजनक आहे.
२०१९ पासून झालेल्या सुधारणेमुळे जे अधिकार कोर्टाला होते ते तहसीलला दिली आहेत. अमरावतीत बांग्लादेश आणि रोहिंग्यानी यांनी आपले जातीचे दाखले काढले आहेत. यात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत बांगलादेशी आणि रोहिंग्या मतदार सुद्धा झाले आहेत. देशातील काही एजंट त्यात काही पार्टीचे लोकं आणि काही बांगलादेशच्या बॉर्डरवरील लोक यात सहभागी होणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमधील अनेक लोकांनी जन्माच्या दाखल्यासाठी अर्ज केले होते. त्यात कोणतेही पूर्वजांचे दाखले न देता फक्त आधार कार्ड आणि राशन कार्डच्या भरवशावर जन्माचे दाखले दिले आहेत. मी अमरावती जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आज त्यांना विनंती केली की पूर्ण अर्ज पुन्हा चेक करा,त्यात जर काही कागदपत्री हे खोटी आढळली तर सर्व जन्मदाखले रद्द करा, ही आपली मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे असे ते म्हणाले.
हा मोठा घोटाळा
अमरावती जिल्ह्यात 14643 आले त्यापैकी 8350 बांगलादेशी आणि रोहिंग्याना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आरोप 1969 च्या कायद्यामध्ये जर देशातील लोक परदेशात गेले तर त्यासंबधीचे सर्व पुरावे घ्यावे लागत होते, मॅजिस्ट्रेट कोर्टात त्या सर्व तपासल्या जात होतं मात्र आता ते तहसीलमध्ये तपासले जात आहे. मुंबई मध्ये 2 कोटी 20 लाख लोक आहेत. पण तिथे 58 लोकांना जन्माचा दाखल दिला. पण अमरावतीमध्ये 9 लाख लोकसंख्या असताना मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र देण्यात येत आहे असा आरोप किरीट यांनी केला आहे.