इकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद; आणि तिकडे भाजपची कार्यकारिणीच बरखास्त; कुठे झाली आहे बंडाळी

कोकणातील भाजप पक्षाच्या असणाऱ्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे आता भाजपने कारवाई केलेला कारवाई गट काय भूमिका घेणार याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

इकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद; आणि तिकडे भाजपची कार्यकारिणीच बरखास्त; कुठे झाली आहे बंडाळी
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 6:04 PM

सिंधुदुर्गः राज्यात एकीकडे भाजप-शिवसेना (Bjp-Shivsena) वाद टोकाला जात असतानाच सिंधुदुर्गात (Sindhudurg) मात्र भाजप पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे दोडामार्ग भाजपाची (Dodamarg) तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांची शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग भाजपची तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील भाजप पक्षाच्या असणाऱ्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे आता भाजपने कारवाई केलेला कारवाई गट काय भूमिका घेणार याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग भाजपची तालुका कार्यकारिणी बंडाळीमुळे बरखास्त करण्यात आली आहे. या कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळे दोडामार्गातील भाजप पक्ष काय भूमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत कलहामुळे पक्षाचे नुकसान होत असल्यामुळे संपूर्ण तालुका कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.

दोडामार्गमध्ये भाजपात दुफळी

दोडामार्गमध्ये भाजपात दुफळी माजली असून काल नगराध्यक्ष निवडीवेळी भाजपच्या नगरसेवकांचा एक गट अनुपस्थित राहिला होता. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या या दुफळीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत राहिल्या. दोडामार्गमध्ये नगराध्यक्ष निवडीवेळी भाजपचे नगरसेवकच ऐनवेळी उपस्थित राहिले नसल्यामुळे भाजपातील दोन गट उघडे पडले. नगराध्यक्ष निवडीवेळी माजी नगराध्यक्षांसह भाजपचे चार नगरसेवक गैरहजर राहिले, त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमता निर्माण झाली होती. भाजपच्या या कृत्यामुळेही सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत.

एक दिवसही उलटा नसतानाच कार्यकारिणी बरखास्त

नगराध्यक्ष निवड होऊन एक दिवसही उलटा नसतानाच भाजपची कार्यकारिणी बरखास्त केली असल्यामुळे दोडामार्ग भाजपमधील वाद आता लपून राहिले नाहीत. त्यामुळे कारवाई झालेला गट आता राजकीय भूमिका काय घेतो याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे वाद आता चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना  उधान आले आहे. एकीकडे आजच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमुळे राज्यातील सगळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, भाजप नेत्यांवर गंभार आरोप केले असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गची भाजप कार्यकारिणी बरखास्त करण्याची वेळ भाजपवर आल्याने आता भाजपमधीलच वाद लपून राहिले नाहीत.

संबंधित बातम्या

Sudhir Mungantiwar on Raut : राऊतांनी मुनगंटीवारांच्या मुलीच्या लग्नातली साडे नऊ कोटीची कार्पेट काढली, आता मुनगंटीवारांचं थेट

फडणवीसजीका एक ब्लू आईड बॉय है, वो उनको डुबानेवाला है, राऊतांनी विसरलेलं नाव आठवणीनं सांगितलं

Sanjay Raut | त्यादिवशी मी अमित शाहांना फोन केला, राऊतांनी त्यारात्रीचं गोपनीय संभाषण उघडपणे सांगितलं

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.