मुद्दा अजित पवार यांचा, भाजपच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनाही केले सवाल?
तुषार भोसले यांनी याबाबत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना त्यांची भूमिका काय अशी विचारणा केली आहे.
नाशिक : छत्रपती संभाजीराजे ही धर्मवीर नव्हतेच ते स्वराज्यरक्षक होते असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानपरिषदेत केला आहे. यावरून अजित पवार यांच्यावर टीका होऊ लागली आहे. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर होते याचे दाखले देण्याचा प्रयत्न केला जात असून अजित पवारांवर हल्लाबोल केला जात आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी यावरून अजित पवार यांच्यावरुण थेट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान आहे, अस्मिता आहे असे म्हणत तुषार भोसले यांनी अजित पवार यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे. याचवेळी त्यांनी संजय राऊत या विषयी काही बोलत नाही त्यांची दातखिळ बसली आहे का? असा सवालही तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना प्रश्न करत आपली भूमिका बदलणार का? असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांचा निषेध करणार का असा सवालही भोसले यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का? संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय त्यावर संजय राऊत बोलणार का ? असा सवाल उपस्थित करून हल्लाबोल केला आहे.
तुषार भोसले यांनी याबाबत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना त्यांची भूमिका काय अशी विचारणा केली आहे.
तुषार भोसले यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुद्दा अजित पवार यांचा असतांनाही बोसले यांनी ठाकरेंना लक्ष केले आहे. यावेळी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.