मंत्री चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीची धमकी, शाईफेकीची धमकी कोणी दिली? जाणून घ्या
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते, त्यामध्ये महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरू केली होती, असं म्हंटले होते.
पिंपरी चिंचवड : भाजप नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी देण्यात आली आहे. यावरून पिंपरी-चिंचवड येथील सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबूकवर पोस्ट करत चंद्रकांत पाटील यांना ही धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या चिंचवड विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोलें यांनी ही धमकी दिली आहे. पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अॅगल घ्या, मू. पो. सांगवी, पवना थंडी यात्रा, आज पुन्हा शाईफेकीची उधळण होणार? मू. पो. सांगवी अशा दोन पोस्ट विकास लोले यांनी केली केली होती. ही पोस्ट डिलिट करण्यात आली असली तरी त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवडच्या पोलीसांनी विकास लोले यांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते, त्यामध्ये महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरू केली होती, असं म्हंटले होते.
त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती, विविध ठिकाणी आंदोलने केली जात होती.
मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती त्यावरूनही राज्यभर वातावरण तापले होते.
शाईफेक करणाऱ्यांवर थेट जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामध्ये शाई फेक केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले होते.
पत्रकारांनाही यामध्ये अटक करण्यात आली होती, मात्र संपूर्ण राज्यभर वातावरण चिघळल्याने वातावरण तापले होते, त्यानंतर पोलिसांचे निलंबन आणि पत्रकारावरील कारवाई मागे घेण्यात आली होती.
यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या सूरक्षेत वाढ करण्यात आली होती, पिंपरी चिंचवड येथे पुन्हा चंद्रकांत पाटील येणार असल्याने पुन्हा धमकी देण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.