महाविकासआघाडीचे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं, चित्रा वाघ यांची टीका
पण सरकारने मगरीचे अश्रू लोकांना दाखवायचे बंद करावे," असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. (Chitra Wagh Criticises Thackery Government)
यवतमाळ : राज्यातील सरकार हे बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार आहे, अशी घणाघाती टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. यवतमाळमध्ये भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबबतची टीका केली. (Chitra Wagh Criticises Thackery Government)
यवतमाळ येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त केला होता. नुकतंच चित्रा वाघ यांनी यवतमाळमधील कापसी कोपरी गावात जाऊन त्या बालकांसह मात्यापित्यांची चौकशी केली. त्यानंतर चित्रा वाघ जिल्हा पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली.
“भंडारा जिल्हा रुग्णालयात 11 बालकांचा होरपळून मृत्यू होऊन एक महिना लोटला होता. त्यानंतर यवतमाळमध्ये बालकांना सॅनिटायझर पाजल्याचे प्रकरण समोर आलं होतं. मात्र या दोन्ही घटनेतील जबाबदारांवर अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही. अशाप्रकारे निष्काळजीपणा करणाऱ्यांना सरकार अभय तर देत नाही ना?” असा प्रश्नही चित्रा वाघ यांना उपस्थित केला.
“मगरीचे अश्रू दाखवायचे बंद करा”
“महाविकासआघाडीचे हे सरकार महिलांची सुरक्षा आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळत आहे. अशा घटनांमध्ये निलंबनाच्या कारवाईने काम भागणार नाही. त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजे, अन्यथा अशा घटना घडत राहतील. मृत बालकांच्या कुटुंबियांना पैसे दिले म्हणजे जबाबदारी संपली, असं सरकारला वाटत असावे. पण सरकारने मगरीचे अश्रू लोकांना दाखवायचे बंद करावे,” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.
“ही घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालक चालक असलेले नेते यावेळी कुठे होते,” असा सवाल अप्रत्यक्षरित्या संजय राठोड यांना केला आहे.
8 Feb 21 चा माझा नियोजीत यवतमाळ दौरा
12 वाजता – भांबोरा ता॰घाटंजी कडे रवाना पल्स पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची भेट
3.00 वा यवतमाळ ZP CO यांची भेट 3.30 वा SP भेट 4.00 वा पत्रकार परिषद स्थळ:भाजपा कार्यालय पुनम चौक सिविल लाईन यवतमाळ @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 8, 2021
पोलिस लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्याची घटना
यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला होता. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत. आरोग्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तिथल्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. (Chitra Wagh Criticises Thackery Government)
संबंधित बातम्या :
यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई
‘त्या’ 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स कसं पाजलं?; चौकशीत समोर आलं धक्कादायक कारण!