भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांच्यावर उधळली स्तुतीसुमणं…नेमका प्रसंग काय होता किरीट सोमय्या यांनीच सांगितलं
भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. खासदार गिरीश बापट यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेले होते, पुण्याचे खासदार गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहे. शरद पवार हे गिरीश बापट यांच्या भेटीसाठी जात असतांना त्याच ठिकाणी काही मिनिटे आधी भाजपचे खासदार गिरीश बापट हे देखील रुग्णालयात पोहचले होते. त्याच वेळी शरद पवार येणार असल्याचे कळताच किरीट सोमय्या हे थांबून राहिले होते. शरद पवार आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांना नमस्कार केला आणि दोन्हीही गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेले. शरद पवार आणि किरीट सोमय्या आल्याचे पाहून गिरीश बापट यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असणार. राजकीय आखाड्यातील विरोधक भेटीसाठी आल्याने तसं वाटणं स्वाभाविक असलं तरी भेटीनंतर बाहेर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. गिरीश बापट यांच्या भेटीदरम्यान काय घडलं आणि शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे हे देखील किरीट सोमय्या यांनी सांगून टाकले आहे.
खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यात सोमय्या म्हणाले, गिरीश बापट यांची प्रकृती पाहण्यासाठी आम्ही आलो होतो.
शरद पवार साहेब हे येणार आहेत म्हणून मी थांबलो होती, शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे त्यांचे नेहमीच आम्ही आदर करतो.
शरद पवार यांच्या कडून सगळ्या राजकारण्यांमी एक घेण्यासारखा आहे मी देखील त्यांच्याकडून एक गुण घेतला आहे, पवार साहेब यांनी बापट साहेब बद्दल खूप विचारपूस केली.
आम्ही आत गेलो, बापट पेरू खात होते आणि लगेच शरद पवार यांनी पेरुवर चर्चा केली, गिरीश बापट यांना शरद पवार म्हणले लवकर संसदेत या असं किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
याशिवाय माध्यम प्रतिनिधी यांनी तुम्हाला पवार साहेब म्हणाले का ? संसदेत या असं असं विचारले त्यावर सोमय्या यांनी माझं काम मी केलं यांचे सरकार घरी बसवले आहे अशी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांच्या विषयी किरीट सोमय्या यांनी पवार साहेबांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असं म्हणत थेट स्तुतीसुमणंच उधळल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.