भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहेत. तर किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 4:49 PM

मुंबई : राज्यातील भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांना न्यायालयाने अटकेपासून दिलासा मिळाला आहे. याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने आय एन. एस. विक्रांत (INS Vikrant) कथित मदत निधी घोटाळा प्रकरणी अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांना त्याच बरोबर पोलिसांना उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तर त्यांना या संदर्भात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या प्रकरणातील पुढील सुनावणी 7 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) न्यायमूर्ती भारती डांगरे समोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने सोमेया यांना दिलेला अटकेपासून दिलासा हा कायम राहणार आहे.

काय आहे प्रकरण

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहेत. तर किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी किरीट सोमैया आणि त्यांचे सुपुत्र निल सोमय्या यांना समन्स बजावण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करत न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर किरीट आणि त्यांचा मुलगा नील सोमेया यांनी मुंबई उच्च न्यायाल्यात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने दोघांना अंतरिम जामीन दिला होता. सोमय्या यांच्या विरोधात या प्रकरणी मुंबईच्या ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.