ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रॉक, रुग्णालयात दाखल

मधुकर पिछड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेनस्ट्रॉक, रुग्णालयात दाखल
मधुकर पिचड
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 11:58 AM

Madhukar Pichad Brain Stroke: महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत अत्यवस्थ झाली आहे. मधुकर पिचड यांना पहाटे ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पिछड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ते 83 वर्षांचे आहे. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर आता नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

पिछड कुटुंबीय पुन्हा घरवापसी करणार?

मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली होती. यामुळे पिछड कुटुंबीय हे पुन्हा घरवापसी करणार असल्याचे चर्चा रंगल्या आहेत. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची बोलले जात आहे.

मधुकर पिचड यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून झाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु 2019 मध्ये त्यांनी मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याचे बोललं जात आहे.

कोण आहेत मधुकर पिछड?

मधुकरराव पिचड हे १९८० ते २००४ या काळात नगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा निवडून आले आहेत. मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, परंतु २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.