वा ! चित्राताई वाघ वा…बाळासाहेब असते तर… नारायण राणे यांचं ट्विट काय?
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात नवीन वळण आले आहे. तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करत याचिका दाखल केली आहे. यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतीश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावरुन विधानसभेसह विधानसभेतही मोठा गदारोळ झाला. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी चित्रा वाघ यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आता नारायण राणे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
नारायण राणेंचे ट्वीट
वा! चित्राताई वाघ वा! छत्रपती शिवरायांच्या 15 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाट्यावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांचीही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई!, असे नारायण राणे म्हणाले.
वा! चित्राताई वाघ वा!@ChitraKWagh pic.twitter.com/J7SI6EhE1P
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 21, 2025
चित्रा वाघ यांची कमेंट काय?
नारायण राणे यांच्या ट्वीटवर आता चित्रा वाघ यांनीही कमेंट केली आहे. धन्यवाद राणे साहेब…..उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है. जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है. मी सत्यासाठी… न्यायासाठी… अशीच लढत राहीन आणि जेव्हा तुमच्या सारखे ज्येष्ठ नेते पाठीशी उभे राहतात तेव्हा लढण्याची ताकद आणखीनच दुणावते… पुनःश्च धन्यवाद नारायण राणे साहेब, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
दरम्यान चित्रा वाघ यांनी काल सभागृहात जोरदार भाषण केले. “दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली. एसआयटी स्थापन केली आहे, तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे. त्याच्यावर संजय राठोड यांचा विषय घेण्यात आला. मी जे करायचं होतं ते केलं. मला जे दिसलं जे पुरावे आले, त्यावर मी लढले. तुम्ही तोंड शिवून बसला होता. मला विचारता ते कसे मंत्रिमंडळात आले, असं मला विचारता”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.