Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी एक क्षणही मुख्यमंत्रीपदावर राहता कामा नये, नारायण राणेंनी हल्ला तीव्र केला, आनंद दिघेंच्या नावाचा पुन्हा वापर
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर त्यांचा निर्णय योग्य असल्याचे कौतूक करत उद्धव ठाकरे यांनी एक क्षणही मुख्यमंत्री पदावर राहता कामा नये, असा तीव्र हल्ला केला. त्यांनी शिंदे यांना उद्देशून तुझा आनंद दिघे झाला असता असा ट्विटरवरुन इशारा ही दिला होता.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीनाट्याने राज्यातील राजकारण पार ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजीतून नारायण राणे(Narayan Rane) कधीकाळी शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते आपले पाजळलेले शस्त्र बाहेरुन काढून उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवितात. यावेळी ही केंद्रीय मंत्री राणे यांनी या बंडाळीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Udhav Thakeray) यांच्या कार्यशैलीवर चांगलेच तोंडसूख घेतले. उद्धव ठाकरे यांनी आता एक क्षण ही मुख्यमंत्री राहता कामा नये असा तीव्र हल्ला त्यांनी चढवला. तुमचा महत्वाचा सहकारी तुमच्यावर नाराजीने बाहेर जात आहे आणि तुम्ही त्याची मनधरणी करण्याचे सोडून त्याला पदावरुन काढत आहात. या मुख्यमंत्र्यांना पदावर बसण्याचा अधिकार नसल्याचा घणघात राणे यांनी यावेळी केला. शिवसेनेने अवघ्या 11 आमदारांचा गटनेता केल्याची शेलकी टिका ही त्यांनी केली.
शिंदे यांची कायम फसवणूक
एकनाथ शिंदे यांना वारंवार मुख्यमंत्रीपद देतो, म्हणून खर्च करायला लावला. पण त्यांना कधीही मुख्यमंत्री केले नाही. मुख्यमंत्रीपदाची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्ममंत्रीपद स्वतःकडे घेतले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यातील स्वाभिमान जागा झाला आहे. मुख्यमंत्री असूनही ठाकरे यांना गेल्या अडीच वर्षात पक्ष सांभाळता आला नाही. शिवसैनिकांशी ते भेट घेत नाहीत. मातोश्रीवरुन फक्त आदेश निघतात. त्यामुळे ही सध्याची वेळ आली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी एकही क्षण मुख्यमंत्री पदावर रहायला नको. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तो दिला नाही. 56 मधील 35 आमदार बाहेर पडले, तरी त्यांनी राजीनामा दिला नाही. एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला अन्यथा जे काही झालं आनंद दिघे यांच्या बाबतीत ते तुमच्या बाबतीत घडलं असते. आनंद दिघेंना मातोश्री बंद होते, असा राणे म्हणाले.
त्यांना 56 आमदारांचा गटनेता नको होता
संजय राऊत यांचा आवाज आता बसला आहे. उद्यापर्यंत तो आवाज बंद होईल असा पलटवार ही त्यांनी केला. वर्षांवर सध्या 11 आमदार असल्याचे मला तिथल्या कर्मचा-यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. त्यांना 56 लोकांचा गटनेता नको, त्यांनी वर्षावर थांबायला नको, असे पक्ष प्रमुख असतात का? जवळचा माणूस जात असताना त्याला समजवायचे सोडून त्याला तुम्ही पदावरुन हटवतात कसा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली आहे, असा आरोप ही त्यांनी यावेळी केला.