महापालिका स्वबळावर लढवणार का? नारायण राणेंचे मोठे विधान, म्हणाले “भाजप…”

विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारी करत आहेत. त्यातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकांवर भाष्य केले.

महापालिका स्वबळावर लढवणार का? नारायण राणेंचे मोठे विधान, म्हणाले भाजप...
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 6:36 PM

Narayan Rane on Municipal corporation : लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकांनंतर आता महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका कधी होतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारी करत आहेत. त्यातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकांवर भाष्य केले.

भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले. यापुढे भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू. मुंबई महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल, असे विधान केले आहे.

“भविष्यात निवडणुका स्वबळावर लढू”

आम्ही भविष्यात निवडणुका स्वबळावर लढू. पण कोणती हे सांगू शकत नाही. कोणतेही खातं सांभाळण्यासाठी नितेश राणे सक्षम आहे. ज्याने बांगलादेशीला जन्माचा दाखला दिला, त्या अधिकार्‍यावर कारवाई व्हावी. राजन साळवी मार्गावर असल्यास पक्ष विचार करेल, असे नारायण राणे म्हणाले.

“मुंबईत भाजपची प्रचंड ताकद”

“शरद पवारांचा आरएसएसने कौतुक केल्यास त्यात वावगे काही नाही. भाजपाचे चांगले दिवस त्याचे तुम्ही स्वागत केलं पाहिजे. लोकांना विकास दिसत आहे. त्यामुळे पक्षप्रवेश होत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल. मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे. कोणत्या भागात, कोणती इंडस्ट्री उभारावी याबाबतीत उदय सामंत आणि माझ्यात चर्चा झाली”, असे नारायण राणेंनी म्हटले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, असं वक्तव्यही संजय राऊतांनी केलं होतं. त्यानंतर सुषमा अंधारेंनी निवडणुका स्वबळावर लढायच्या की, एकत्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच महायुती म्हणून मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होतं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.