24 डिसेंबर रोजी संजय राऊत तुरुंगात जाणार?; नितेश राणे यांचा सर्वात मोठा दावा काय?

भाजपा नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांना येत्या 24 डिसेंंबर रोजी अटक होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच इंडीया आघाडीतील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल काढलेल्या वक्तव्याचा निषेध उद्धव ठाकरे करणार की नाही असा सवाल केला आहे.

24 डिसेंबर रोजी संजय राऊत तुरुंगात जाणार?; नितेश राणे यांचा सर्वात मोठा दावा काय?
NITESH RANE AND RAUT
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 2:53 PM

मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : महायुती सरकारमध्ये काही गॅंगवॉर वगैरे नाही. माझ्या माहितीनूसार सर्वकाही आलबेल आहे. परंतू संजय राऊतांच्या आरोपात काही तथ्य नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल जे गलिच्छ विचार मांडले आहेत. त्यावर एक मुख्यमंत्री असा कसा बोलू शकतो म्हणून देशभरात टिका होत आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. सनातन धर्मावर टिका झाली तरी त्यांनी काही म्हटलेलं नाही. संजय राऊतांकडून गलिच्छ मानसिकतेचं प्रदर्शन झाले असून त्यांना 24 डिसेंबर रोजी अटक होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा नेते नितेश राणे यांनी केला आहे.

ज्या इंडिया अलायन्समध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आहे. त्यांचे मित्र नितीश कुमार महिलांबद्दल अनुद्गार काढत आहेत. तरी उद्धव ठाकरे त्यावर काही बोलायला तयार नाहीत अशी टिका भाजपा नेते नितेश राणे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की सनातन धर्मावर स्टॅलिन यांनी टिका केली तरी ठाकरे काही बोलले नाहीत. संजय राऊत गलिच्छ मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. महिलांबद्दल अपमान होऊनही यावर काही बोलत नाहीत, स्वप्ना पाटकर यांच्या घरावर रात्री एक वाजता बाटल्या फेकल्याची बातमी आली आहे. कोण स्वप्ना पाटकर ? ज्यांना शिव्या देताना संजय राऊत यांची क्लिप व्हायरल झाली होती. सुजित पाटकरला अटक झाली तो राऊत यांचा भागीदार आहे. आता ते म्हणणार का माझा काही संबंध नाही. पण आपण स्वत: स्वप्ना पाटकर यांनी भेटणार असून त्यांना कोण धमकावतंय ते विचारणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

स्वप्ना पाटकर यांच्या कुटुंबाला भेटणार

नितेश राणे पुढे म्हणाले की स्वप्ना पाटकर यांच्या घरात भीतीचं वातावरण आहे. मी त्या महिलेच्या कुटुंबाला भेटणार आहे. कुणी त्या महिलेला धमकावत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणातही केस चालू आहे. आदित्य ठाकरे आणि रिया यांचे चॅटींग आहे, अशी माहीती याचिकाकर्ते यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी याचिकाकर्त्याला 50 खोक्यांची ऑफर दिली आहे. ही माहीती खोटी असेल तर आमच्यावर अब्रु्नुकसानीचा दावा टाका असेही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरा काढणार असतील तर चांगलेच आहे. परंतू त्यांना हे ब्रह्मास्र काढण्याची वेळ येणार नसल्याचा दावाही नितेश राणे यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.