2024 मध्ये त्याला आपटून टाकू म्हणत अमोल कोल्हे यांच्यावर नीतेश राणे यांची जहरी टीका, अजित पवार यांची ही केली नक्कल
अजित पवार यांची मिमीक्री करत अजित दादा यांना अमोल कोल्हे लिहून देतो आणि ते वाचून दाखवतात, परंतु... हे आत्ताच झालं पाहिजे..काय वाचताय तुम्ही म्हणत अजित पवार यांच्यावरही राणे यांनी खोचक टीका केली.
वर्धा : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर बोलत असतांना त्यांची जीभ घसरली आहे. राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख राणे यांनी केला आहे. 2024 ला अमोल कोल्हेंला आपटून टाकू. अमोल कोल्हे कुठेही भेटू दे त्याला दाखवतोच असं नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. याशिवाय कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. त्याला 2024 ला आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, असेही आमदार राणे म्हणाले आहे.
याच दरम्यान अमोल कोल्हे यांच्यावर खोचक टीका करत असतांना नितेश राणे यांनी अजित पवार यांचीही नक्कल केली आहे.
अजित पवार यांची मिमीक्री करत अजित दादा यांना अमोल कोल्हे लिहून देतो आणि ते वाचून दाखवतात, परंतु… हे आत्ताच झालं पाहिजे..काय वाचताय तुम्ही म्हणत अजित पवार यांच्यावरही राणे यांनी खोचक टीका केली.
याचवेळी अमोल कोल्हे लिहून देतो आणि अजित पवार वाचतात, धर्मवीर नावाची पदवी त्यांना पुसून टाकायची आहे असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
मागे काही दिवसांपूर्वी धर्मवीर कि स्वराज्यरक्षक असा वाद निर्माण झाला होता, त्या दरम्यान स्पष्टीकरण देतांना नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर अजित पवार यांनी राणे यांची चांगलीच खिल्ली उडवली होती.
तर राणे यांनीही अजित पवार यांना धरणवीर नावाची पदवी दिल्याचे सांगत जहरी टीका केली होती, त्यातच आता या वादात अमोल कोल्हे यांनाही राणे यांनी ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे येत्या काळात अमोल कोल्हे आणि नितेश राणे यांच्यात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. त्यातच अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान राणे यांनी दिल्याने खासदार कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.