भाईचारा शिकवू नका…. नितेश राणेंचं आक्रमक हिंदूत्व; भाजपची निवडणूक खेळी काय?

भाजपचे नेते नितेश राणे यांची अचलपूरमध्ये प्रचंड मोठी रॅली झाली. या रॅलीला हजारो लोक आले होते. हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेने या रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीतील गर्दी पाहता नितेश राणे यांची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे. राणे यांनी पुन्हा एकदा या रॅलीतून आक्रमक भाषण करत विरोधकांना इशारेही दिले आहेत.

भाईचारा शिकवू नका.... नितेश राणेंचं आक्रमक हिंदूत्व; भाजपची निवडणूक खेळी काय?
nitesh rane
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 9:10 PM

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यांनी घेरलेलं असतानाच भाजपने मात्र आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यातही भाजपचे नेते नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधिक हात घातला आहे. नितेश राणे हे ज्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यांच्या मंचावर जाऊन अत्यंत आक्रमक भाषणं करत आहेत. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे नितेश राणे हे भाजपमधील आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर येत असल्याचं स्पष्ट होत आहे. नितेश राणे यांच्या या आक्रमक हिंदुत्वावर अजितदादा गटाकडून आक्षेप घेतला जात असला तरी भाजपने मात्र राणे यांची पाठ राखणच केली आहे. त्यामुळे राणे यांच्या माध्यमातून हिंदू मत एकवटण्याची भाजपची ही खेळी तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

नितेश राणे यांनी गणेशोत्सवात अनेक गणपती मंडळांना भेट देऊन आक्रमक भाषण केलं. यापूर्वीही अनेक हिंदुत्वावादी संघटनांच्या कार्यक्रमात जाऊन राणे यांनी मुस्लिमांना टार्गेट केलं होतं. त्याला भाजपच्या मित्र पक्ष असलेल्या अजितदादा गटाने आक्षेप घेतला होता. स्वत: अजित पवार यांनी राणेंना जपून बोलण्याचा आणि वाचाळवीरांना आवर घालण्याचा सल्ला भाजपला आणि राणेंनाही दिला होता. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश यांची पाठराखण करून भाजप राणेंच्या पाठी असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यामुळे नितेश राणे यांना बळच मिळालं असल्याचं बोललं जात आहे.

नितेश राणे ही भाजपची चाल?

नितेश राणे यांच्या माध्यमातून हिंदुत्वावादी मते एकत्र करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ठाकरे गटाकडे आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडे ही मते वळू नये ही या मागची खेळी असल्याचं सांगितलं जात आहे. नितेश राणे हे त्यांच्या आक्रमक भाषणांनी शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील चेहराही झाले आहेत. याशिवाय आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणूनही ते पुढे आले आहेत. नितेश राणे यांना संघाचंही समर्थन असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभेत भाजपला मतांची बेगमी कमी पडू नये आणि हिंदू मतांमध्ये विभाजन होऊ नये म्हणून भाजप राणेंच्या माध्यमातून काळजी घेत असल्याचंही सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

अचलपूरमध्ये काय घडलं?

अमरावतीच्या अचलपूरमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. नितेश राणे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती. अचलपूर आणि परतवाडा विभागात रॅली निमित्ताने बाईक रॅली काढण्यता आली. या रॅलीला हजारो लोक आले होते. नितेश राणे यांना ऐकण्यासाठी हे सर्व लोक एकवटले होते. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. यावेळी नितेश राणे यांनीही आक्रमक भाषण केलं. नितेश राणे यांची सभा होऊ देणार नाही, असं अनेकजण म्हणत होते. मी त्यांना सांगतो. हिंदू को फ्लावर समजे क्या? हिंदू फायर है, फायर, असं म्हणत नितेश राणे यांनी विरोधकांना इशाराच दिला.

तेव्हा मिरच्या का लागतात

जो हिंदूंच्या मागे लागेल त्याचं थोबाड फोडून टाका. तुम्ही मस्ती करणार. मग आम्ही सहन करायचं का? आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायच नाही. आम्हाला भाईचारा शिकवू नका. जो नियम मुस्लिमांच्या सणांना लागतो. तोच गणपती सणालाही लावा. जेव्हा हिंदू जल्लोष करतो तेव्हा तुम्हाला मिरच्या का लागतात? असा सवालही नितेश राणे यांनी केला.

सर्वधर्मसमभाव मानू नका

हिंदूंना सांगतो सर्वधर्मसमभाव मानायचा नाही. हे हिंदू राष्ट्र आहे. या देशात 90 टक्के हिंदू आहेत. जो मुसलमान देशाला मानतो, तिरंग्याला सलाम करतो तो राष्ट्रभक्तच आहे. आम्ही त्यांच्या विरोधात नाही. पण जे जिहादी आहेत, त्यांना आमचा कडाडून विरोध आहे. हे हिंदू राष्ट्र आहे आणि या राष्ट्रात हिंदूंचं हित बघितलं जाईल. हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना जागेवर ठेवणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.