Pankaja Munde : ‘ज्यादिवशी बदनामीसारखे काम होईल, तो शेवटचा श्वास असेल’
माझे ऑपरेशन (Operation) झाले आहे आणि माझ्यावर खापर फोडतायत, की पंकजा मुंडेनी (Pankaja Munde) जिल्ह्याची बदनामी केली. मी कधी बदनामीसारखे काम केले का? तसे काम केले तर तो शेवटचा क्षण असेल,असे भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझे ऑपरेशन (Operation) झाले. बोलायला त्रास होतोय. घसा दुखतोय आणि माझ्यावर खापर फोडतायत, की पंकजा मुंडेनी (Pankaja Munde) जिल्ह्याची बदनामी केली. मी कधी बदनामीसारखे काम केले का? तसे काम केले तर तो शेवटचा क्षण असेल,असे भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. लोक आज माझ्या आणि प्रीतम यांच्या नावाने आपल्या मुलींची नावे ठेवतात. लोक आपल्या मुलांचे नाव ठेवताना लोक आमचा चेहरा समोर आणून ठेवतात, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आपले सरकार येणारच आहे. लोक घरी आणून मत देतील, असे काम विरोधकांनी केले, एवढे वाईट काम या सरकारातील लोकांनी केले, असे त्या म्हणाल्या. तर OBC राजकीय आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
Latest Videos