आता बस्स ! उगाच सनसनी करणारी बातमी नको, पंकजा मुंडे का भडकल्या ?
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण सध्या भलतंच गाजत असून पूजा यांच्याप्रमाणेच त्यांचे कुटुंबीयही अडचणीत सापडले आहेत. मात्र आता या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं असून हा वाद वाढताना दिसणार आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण सध्या भलतंच गाजत असून पूजा यांच्याप्रमाणेच त्यांचे कुटुंबीयही अडचणीत सापडले असून सध्या ते बरेच चर्चेत आहेत. पूजा यांची आई मनोरमा आणि वडील यांच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र आता याप्रकरणाने एक नव वळण घेतलं असून त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र यामुळे पंकजा मुंडे या भलत्याच भडकल्या असून त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच आपल्या विरोधात अशा बातम्या छापणाऱ्या काही चॅनेल्सवर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी स्प्ष्ट केलं आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं असून ‘ 2014 पासून माझ्याबाबतीत असंच करतात’ असं म्हणत आपलं नाव नाहक गोवण्यात आल्याचा पंकजा यांनी म्हटलं आहे. आता बस्स!! असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत असे प्रकार खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला.
पंकजा मुंडे यांचं ट्विट काय ?
Abp माझा वर आणि इतर चॅनल वर मानहानी चा दावा करणार ..अशी बातमी खात्री न करता देऊ नये साधा लोकशाही ही संकेत आहे..आता बस्स!!मला साधी विधान परिषद मिळाली तर सुरू..मुद्द्यांचे बोला..असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोका.. उगीच सनसनी करणारी बातमी देऊ नका…माझ्या वर 2014 पासून हे असेच करतात..पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र ?
Abp माझा वर आणि इतर चॅनल वर मानहानी चा दावा करणार ..अशी बातमी खात्री न करता देऊ नये साधा लोकशाही ही संकेत आहे..आता बस्स!!मला साधी विधान परिषद मिळाली तर सुरू..मुद्द्यांचे बोला..असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोका.. उगीच सनसनी करणारी बातमी देऊ नका…माझ्या वर…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 15, 2024
काय आहे प्रकरण ?
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला 12 लाख रुपयांची देणगी दिली होती, अशा काही बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरूनच खेडकर यांचे पंकजा मुंडे यांच्याशी संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र मुंडे यांच्याकडून या सर्व बातम्या फेटाळून लावण्यात आल्या आहे. ‘ गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला डॉ मनोरमा खेडकरांच्या नावाचा चेक मिळाला नाही. अशी कुठलीही रक्कम मुंडे प्रतिष्ठानमध्ये जमा नाही. मनोरमा खेडकर यांच्या नावाने मुंडे प्रतिष्ठानला १२ लाखांचा चेक देण्यात आला ही बाब खोटी आहे’ असं स्पष्ट करण्यात आलं. याप्रकरणी पंकजा मुंडे संबंधित चॅनेल्सविरोधात मानहानीचा दावा करणार आहेत. आपल्या बदनामीसाठी जाणूनबुजून अश्या बातम्या चालवल्या जात असल्याचा दावाबी पंकजा यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानसाठी अनेकांची मदत देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र ते चेक स्वीकारले नसल्याचा दावा मुंडे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.