‘बटेंगे तो कटेंगे’… बोलल्या काय आणि छापलं काय?, नेमका काय गोंधळ झाला?; पंकजा मुंडे यांचा अखेर मोठा खुलासा

बटेंगे तो कटेंगे संदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आता त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

'बटेंगे तो कटेंगे'... बोलल्या काय आणि छापलं काय?, नेमका काय गोंधळ झाला?; पंकजा मुंडे यांचा अखेर मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 6:53 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. प्रचाराला वेग आला असून, बड्या नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. दरम्यान त्यानंतर आता अनेक भाजप नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देण्यात येत आहेत.

याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं होतं. खरं सांगायचं तर माझं राजकारण वेगळं आहे. मी भाजपची आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे असं मला वाटतं, सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी नेत्याची असते. त्यामुळे महाराष्ट्रात असा कोणाताही विषय आणण्याची गरज नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी स्वत: याबाबत मोठा खुलासा केला आहे, त्या सोलापुरात बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

मी एवढी अपरिपक्व नाही की माझ्या पक्षाच्या मताशी मी असहमती दाखवेल. मी माझ्या राजकीय जीवनात कोणत्याही लहान कार्यकर्त्याच्या स्टेटमेंटवर उत्तर देत नाही. योगीजी तर खूप मोठे नेते आहेत, त्यांच्यावर बोलण्याचे काहीच कारण नाही. प्रिंट मीडियाचे तीन पत्रकार माझ्याकडे आले होते, त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे सर्व पुरावे लिखित आणि रेकॉर्ड स्वरूपात आहेत.  त्यांनी मला विचारलं की तुमचे नेते असं असं म्हणाले, त्यावर मी हे उत्तर दिलं की, “त्यांच्याशी मी सहमत असायचं कारण नाही” मी पक्षाशी सहमत नाही असे त्यांनी छापले. मी भाजपचे नाव देखील घेतले नाही. मात्र एका चॅनलने उतावळे पणाने ते लिहून टाकलं, छापून टाकलं. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  पुढे बोलताना त्या म्हणाल्या की  भाजपच्या मताशी मी सहमत नाही, असं मी कुठेही म्हटले नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.