उद्धव ठाकरे यांचा मुंब्रा दौरा, प्रवीण दरेकर यांचा जोरदार हल्लाबोल; ‘त्या’ मुद्द्यावरून घेरलं

| Updated on: Nov 11, 2023 | 4:31 PM

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्यावरुन त्यांना घेरले आहे. ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी आता तरी लक्ष द्यायला हवे आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत काय झाले ते पाहावे आणि आत्मचिंतन करावे.

उद्धव ठाकरे यांचा मुंब्रा दौरा, प्रवीण दरेकर यांचा जोरदार हल्लाबोल; त्या मुद्द्यावरून घेरलं
pravin darekar
Follow us on

विनायक डावरुंग, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : मुंब्रा येथे शिवसेनेची शाखेवर बुलडोझर फिरविल्याने वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोस्टर देखील फाडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उद्धव ठाकरे मुंब्रा येथे आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला निघाले आहेत. या प्रकरणावरुन भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केवळ भावनिक आवाहन करुन शिव्या घालणे आता बंद करावे. त्यांनी ग्रामपंचायतीत त्यांच्या पक्ष शेवटून पहिला आल्याने आत्मचिंतन करावे असा सल्ला दरेकर यांनी ठाकरे यांना दिला आहे.

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्यावरुन त्यांना घेरले आहे. ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरेंनी आता तरी लक्ष द्यायला हवे आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत काय झाले ते पाहावे आणि आत्मचिंतन करावे. जितेंद्र आव्हाड यांना मतदार संघात हिंदू मुस्लीम वाद उकरून आपली मतं अबाधित राखायची आहेत, त्यामुळे त्यांना राजकारण करायचं आहे. ठाकरे यांना शिंदे यांच्याकडे जाणारे शिवसैनिक रोखायचे आहेत त्यामुळे ते भावनिक साद घालत आहेत. त्यांनाही मुस्लीम मते मिळतात का याचे प्रयत्न करायचे आहेत. परंतू पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखायची असल्याने त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली यावर त्यांनी ही भेट राजकीय असू शकते अशी प्रतिक्रीया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. या उभयतामध्ये काय चर्चा झाली किंवा त्यांच्या मनात काय आहे हे तेच सांगू शकतील असेही त्यांनी सांगितले. सरकार पहिल्या दिवसांपासून मराठा आरक्षणा बाबत गंभीर असून नोंदी तपासून गांभीर्याने काम करीत आहे. अरविंद सावंत यांच्या पक्षाची आरक्षण संदर्भातील भूमिका काय आहे हे सर्वांना माहित आहे. शिवसेनेची आधीपासून आरक्षण विरोधी भूमिका होती आता ते आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहेत. परंतू त्यांना यश काही मिळत नसून ग्रामपंचायतीत त्यांना त्याची जाागा लोकांनी दाखविली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. कुणबी प्रमाणपत्र सर्वांना बंधनकारक नाही. ज्यांना हवं ते घेतील असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार आमच्या सोबत आले तर स्वागत..

शरद पवार आमच्या सोबत आले तर त्यांचे स्वागतच आहे. मध्ये पण शरद पवार येणार होते परंतू गाडी कुठे थांबली हे समजले नाही, आमच्या तीन पक्षांना जनतेने चांगले समर्थन दिले आहे. आमच्यात चांगला सुसंवाद असून कुठेही कसा विसंवाद नसल्याचा दावाही प्रवीण दरेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला आहे.