शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा, भाजप नेत्याचे टीकास्त्र

गणेशोत्सवानिमित्त अनेक राजकीय नेते लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मात्र शरद पवार यांच्या या कृतीनंतर भाजप नेत्याने त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा, भाजप नेत्याचे टीकास्त्र
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 2:54 PM

आगामी विधानसभा निवडणुका आता काहीच महिन्यांच्या अंतरावर आल्या आहेत. त्या निवडणुकांमुळेच शरद पवार यांना आता छत्रपती शिवाजी महाराज तसेच लालबागच्या राजाची आठवण आझली आहे. मात्र त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे हे निव्वळ ढोंग आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सोमवारी सकाळी शरद पवार हे त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनला गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. मात्र त्यांच्या याच कृतीनंतर प्रवीण दरेकरांनी पवार यांच्यावर कडाडून टीका केलीये.

काय म्हणाले प्रवीण दरेकर ?

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडीओद्वारे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ 40 वर्षांनंतर (मध्यंतरी) शरद पवार रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. आणि आता 30 वर्षांनी पुन्हा त्यांनी जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना आता पवार साहेबांना रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण आली. मी लालबागच्या राजाकडे प्रार्थना करतो, की त्यांना हिंदुत्वाबाबतीत सुबुद्धी मिळो,’ असे दरेकर म्हणाले..

व्हिडीओद्वारे दरेकरांची शरद पवारांवर टीका

ज्ञानेश्वर महाराव यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा, विठूरायाचा,हिंदुत्वाचा अपमान केला. मात्र त्यावर ते ( शरद पवार) काहीच बोलले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले. निवडणुकीच्या दृष्टीने, नौटंकी का होईना, लालबागच्या राजाने त्यांना सुबुद्धी दिली आहे. पण महाराष्ट्रातील जनतेला त्यांच हे ढोंगी प्रेम, ढोंगी श्रद्धा निश्चितच समजून येईल, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्ञानेश्वर महाराज यांनी पवारांच्या उपस्थितीत हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याचाही त्यांनी समाचार घेतला.

गृहमंत्री अमित शाह लालबाग राजाच्या चरणी लीन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते. अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुंबई दौऱ्यानिमित्त आलेल्या अमित शाह यांनी आज (9 सप्टेंबर) लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची पत्नीही उपस्थित होती. दुपारी 12 च्या सुमारास ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले. त्यांनी बाप्पााला नारळाचे तोरण अर्पण केले. तसेच त्याच्या चरणावर हळद, कुंकू आणि फुलंही वाहिली. यानंतर शाह यांनी बाप्पााच्या चरणावर डोकं ठेवत आशीर्वाद मागितला. गेल्यावर्षीही अमित शाह यांनी सहकुटुंब लालबाग राजाचे दर्शन घेतले होते. लालबागचा राजाला दाखल होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.