नव्या सरकारचा शपथविधी कधी? तारीख ठरली; भाजप नेत्याने सांगितला संपूर्ण प्लॅन

मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे.

नव्या सरकारचा शपथविधी कधी? तारीख ठरली; भाजप नेत्याने सांगितला संपूर्ण प्लॅन
महायुती
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 3:27 PM

Maharashtra Government Formation Date : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच मुख्यमंत्री कोणाचा होणार, यावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

येत्या ३० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्रि‍पदाचा आणि मंत्रि‍पदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

20 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ?

दरम्यान महायुतीकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत. त्यातच आता नवीन सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असेही बोललं जात आहे. यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंचा राजीनामा

त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.