धक्कादायक… भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग?, किती लाखाची लूट, काय म्हणाल्या नवोदिता घाटगे?

कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. सध्या ते बरेच चर्चेत आले आहेत, मात्र त्यामागचं कारण थोडं वेगळ आहे.  समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्यासोबत फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नवोदिता यांची ऑनलाइन फसवणूक झाली.

धक्कादायक... भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग?, किती लाखाची लूट, काय म्हणाल्या नवोदिता घाटगे?
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 9:45 AM

कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. सध्या ते बरेच चर्चेत आले आहेत, मात्र त्यामागचं कारण थोडं वेगळ आहे.  समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्यासोबत फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नवोदिता यांची ऑनलाइन फसवणूक झाली. त्यांना तब्बल 20 लाखांचा फटका बसल्याचं उघडकीस आल्याने खळबळ माजली. मात्र या प्रकरणावरून हसन मुश्रीफ गटाने घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता नवोदिता घाटगे यांनी आपलं मौन सोडलं आहे. ‘ या प्रकरणावरून राजकारण करण्याची गरज नाही. समरजित घाटगे यांचं नाव यात घ्यायचं कारण नाही’ अशा शब्दांत नवोदिता यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. पुन्हा कोणाची अशी फसवणूक होऊ नये म्हणून मी रीतसर तक्रार सुद्धा दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.

नवोदिता यांची तब्बल 20 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ माजली. या प्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली. पण पोलिसांकडून या प्रकरणी अपेक्षित अशी कारवाई करण्यात आली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी या माध्यमातून घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांची काही दिवसापूर्वीच अज्ञातांनी 20 लाख रुपयांची फसवणूक केली. मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स आणि बनावट पासपोर्ट असल्याची बतावणी करून आयकर आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत दोघाजणांनी ऑनलाोईन ही फसवणूक केली. दरम्यान या प्रकरणावरून ष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ गटाने घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

नवोदिता यांनी विरोधकांना ठणकावलं

मात्र आता याच मुद्यावरील मौन नवोदिता घाटगे यांनी सोडलं असून विरोधकांना चांगलचं ठणकावलं आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत, या प्रकरणावरून राजकारण करण्याची गरज नाही आणि समरजित घाटगे यांचं नाव यात घ्यायचं कारण नाही असं त्यांनी सुनावलं.

काय म्हणाल्या नवोदित घाटगे ?

पार्सलचं कारण सांगून मला एका प्रकारे हिप्नोटाईज करण्यात आलं. यामध्ये मला 20 लाख रुपये गमवावे लागले. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे.मात्र पुन्हा कोणाची अशी फसवणूक होऊ नये म्हणून मी पोलिसांमध्ये रीतसर तक्रारसुद्धा दिली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून राजकारण करण्याची गरज नाही आणि समरजित घाटगे यांचं नाव यात घ्यायचं कारण नाही, असं त्यांनी ठणकावलं. दरम्यान समरजित घाटगे यांनी देखील पत्नीची पाठराखण केली आहे.

घाटगे यांच्या पत्नीसोबत नेमकं काय घडलं ?

समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्ज असल्याचा दावा तोतया अधिकाऱ्याने केला होता. तसेच नवोदिता यांना आणखी एका अधिकाऱ्याने फोन करत पार्सलमध्ये अंमली पदार्थ आणि इतर वस्तूंमुळे गुन्हा दाखल होऊ शकतो, तसेच त्यामुळे मोठी शिक्षा होऊ शकते, असा दावा केला. तसेच या कारवाईपासून वाचायचं असेल तर 20 लाख रुपये पाठवा, अशी मागणी या तोतया अधिकाऱ्यांनी केली. हे तोतया अधिकाऱ्यांनी नवोदिया घाटगे यांना घाबरवण्याचा इतका प्रयत्न केला की, त्यांनी 20 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने आरोपींना दिल्याचा दावा केला जातोय. संबंधित फसवणुकीचा प्रकार नवोदिता यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात आधी तक्रार केली. समरजिक घाटगे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या प्रकरणाचा युद्ध पातळीवर छळा लागणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.