Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची चुरस वाढली, पाचव्या फेरीत सत्यजित कदम यांना अधिक मते; जयश्री जाधव करिश्मा कायम ठेवणार?

Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. गेल्या चार फेरीत आघाडीवर असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या मतांच्या आघाडीला पाचव्या फेरीत ब्रेक लागला आहे.

Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची चुरस वाढली, पाचव्या फेरीत सत्यजित कदम यांना अधिक मते; जयश्री जाधव करिश्मा कायम ठेवणार?
पाचव्या फेरीत सत्यजित कदम यांना अधिक मते; जयश्री जाधव करिश्मा कायम ठेवणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 10:00 AM

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी  (Kolhapur by Election Result ) सुरू आहे. गेल्या चार फेरीत आघाडीवर असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या मतांच्या आघाडीला पाचव्या फेरीत ब्रेक लागला आहे. भाजपच्या सत्यजित कदम  (satyajeet kadam) यांनी पाचव्या फेरीत जयश्री जाधव  (jayshree jadhav) यांच्यापेक्षा अधिक मते घेतली आहे. त्यामुळे जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यातील मतांचं अंतर कमी झालं आहे. पाचव्या फेरीत सत्यजित कदम यांनी 525 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्यजित कदम हे जयश्री जाधव यांची लीड तोडणार असल्याचं सांगितलं जात असतानाच सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची चुरस अधिक वाढली आहे. अजूनही 20 राऊंड बाकी आहेत. त्यामुळे या उरलेल्या फेरीत सत्यजित कदम जाधव यांचं लीड तोडण्यात यशस्वी ठरतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील सहावी फेरी पार पडली आहे. पाचव्या फेरीत सत्यजित कदम यांनी 525 मतांची आघाडी घेतली होती. पाचव्या आणि सहाव्या फेरीतील मते ही सत्यजित कदम यांचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघातील होती. सत्यजीत कदम याच मतदारसंघातील नगरसेवक होते. त्यामुळे या मतदारसंघातील हक्काची मते कदम यांच्या पारड्यात पडतील असं वाटत होतं. मात्र, आपल्या हक्काच्या मतदारसंघातूनही कदम यांना मते खेचून आणता आली नाहीत. तर, जयश्री जाधव यांना मात्र, ही मते मिळवण्यात यश आलं आहे.

पुढच्या फेऱ्या महत्त्वाच्या

सातवी आणि आठवी फेरी हा सर्वसामान्यांचा मतदारसंघ आहे. विचारे माळ आणि सदर बाजारातील मतांची मोजणी होणार आहे. त्यामुळे ही मते कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच त्यानंतर रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, नागाळा पार्क आणि ताराबाई पार्क या उच्चभ्रू मतदारसंघातील मतांची मोजणी होणार आहे. हा वर्ग कुणाच्या बाजूने आपला कौल देतो हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

जयश्री जाधवांना 9 हजार मतांची आघाडी

पाचव्या फेरी अंतरी जयश्री जाधव यांना 22 हजार 691 मते मिळाली आहेत. भाजपला 15 हजार 933 मते मिळाली आहेत. जयश्री जाधव यांनी पाचव्या फेरी अखेर 6 हजार 758 मतांची आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांना 27 हजार 380 मते मिळाली आहेत. तर कदम यांना 18 हजार 905 मते मिळाली आहेत. जयश्री जाधव यांनी तब्बल 9 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे जाधव आपला करिश्मा कायम ठेवतात की कदम आघाडी घेण्यात यशस्वी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूरच्या उत्तरच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचं पारडं जड, जयश्री जाधव यांची दोन हजार मतांची आघाडी

Kolhapur उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल आज? कोण मारणार बाजी

Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात “पंजा कसणार की कमळ” फुलणार?

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....