मुंबई : वीर सावरकर यांच्याशी संबंधित सुरु असलेला पत्राच्या वादाचा संबंध आता भाजप प्रवक्त्याने शिवाजी महाराजांपर्यंत नेलाय. त्या काळात सुटकेसाठी माफी मागितली जायची. शिवाजी महाराजांनीसुद्धा औरंगजेबाला पाच पत्रं पाठवली होती, असं धक्कादायक विधान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलंय. यावरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना भाजपने नेमकी काय भूमिका घेतलीय याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !