‘आजवर ‘झुकेगा नही’ असे म्हणणारे शिवसेना आमदार आता कुणाला घाबरत आहेत?’
आजवर 'झुकेगा नही' असे म्हणणारे शिवसेना आमदार आता कुणाला घाबरत आहेत? असा सवाल विचारत जीवाला धोका असेल तर शिवसेना आमदार तक्रारी करतील अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : विधानपरिषद निवडणूकीचा निकाल लागताच महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi Government) पायाखालची वाळू सरकली आहे. ही वाळू सरकण्याचे कारण ही महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी. शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करताना आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह घरोबा नाही असे म्हणत बंड पुकारले आहे. तर पुन्हा भाजपशी युती करा. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील तर उपमुख्यमंत्री पदावर मी असेन असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेकडून यासंदर्भात बैठक पार पडली. ज्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला निर्णय घेतला आणि शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यावर आता शिवसेनेतच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. तर शिंदे यांना हटविण्यातबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने गटनेते पदावरून हटविण्याचा कायदा नसल्याचे मत त्यांनी मांडले आहे. तर आजवर ‘झुकेगा नही’ असे म्हणणारे शिवसेना आमदार आता कुणाला घाबरत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.
सध्या राज्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या नाराजी नाट्यावरून जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तर यामागे भाजपचे ऑपरेशन लोटस चे काम सुरू असल्याचेही बोलले जात आहे. तर यावादानंतर शिंदेची शिवसेनेकडून दखल घेत थेठ त्यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून काढण्यात आले आहे. त्यावरूनही आता शिवसेनेवर टीका होताना दिसत आहे. तर याच मुद्द्यावनरून भाजपनेही शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून अशा पद्धतीने गटनेते पदावरून हटविण्याचा कायदा नसल्याचे म्हटले आहे.
शिवसेना आमदार आता कुणाला घाबरत आहेत?
तसेच सध्या शिवसेनेच्या जवळ आमदारांची संख्याच नाही. त्यामुळे अशी कृती करता येणार नसल्याचेही आठवण त्यांनी करून दिली. शिवसेनेला बंडाळीचा मोठा अनुभव असल्याचा चिमटा घेत उद्धव ठाकरे यांच्या या बाबतीतल्या बैठका हा नेहमीचा पॅटर्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आजवर ‘झुकेगा नही’ असे म्हणणारे शिवसेना आमदार आता कुणाला घाबरत आहेत? असा सवाल विचारत जीवाला धोका असेल तर शिवसेना आमदार तक्रारी करतील अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, त्यांना बैठका घेण्याचा हा नेहमीचा पॅटर्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर जीवाला धोका असेल तर शिवसेना आमदार तक्रारी करतील अशी उपरोधिक प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.