अजित पवार आमच्यासोबत आले नाहीत तर…; राष्ट्रवादीमधील बंडावर भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांनी महायुतीला पाठिंबा का दिला? याबाबत भाजपच्या बड्या नेत्याकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे.

अजित पवार आमच्यासोबत आले नाहीत तर...; राष्ट्रवादीमधील बंडावर भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवार, अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 7:37 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यंदांची निवडणूक महाविकास आघाडीविरोधात महायुती अशीच रंगणार आहे. मात्र भाजपनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत आम्ही निवडणूक लढलो नाही तर त्यांचा व्यक्तिगत वाद झाल्यानं त्यांनीच आम्हाला पाठिंबा दिला, असं दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान  राजकारणातील बदलती परिस्थीत पाहाता आम्ही काँग्रेस सोडून इतर घटक पक्षांना सोबत घेऊ शकतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दानवे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील यावेळी जोरदार हल्लाबोल केला. 2019 ला विधानसभा निवडणूक झाल्या. आम्ही कामाच्या जोरावर जनतेला कौल मागितला. जनतेने भाजप शिवसेना पक्षाला बहुमत दिलं. मात्र जनमताचा आदर त्यांनी केला नाही. बाळासाहेबांचं ज्या विचारांशी कधीही जमलं नाही त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले. राज्यात आता भाजप शिवसेनेचं सरकार येणार आहे, असं दानवे यांनी म्हटलं आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते दुसऱ्यावर आरोप करतात असा टोलाही यावेळी दानवे यांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून अचानक माघार घेतली. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना रजकारणात हस्तक्षेप करायचा नसेल म्हणून त्यांनी माघार घेतली. त्यांच्या निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. आम्ही देखील म्हणतो काँग्रेस, ठाकरे यांना पाडायचं आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. लोकसभेचं वातावरण आता नाही. राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्णयाकडे बघितलं तर त्यांनी जनतेला दिलासा देण्याचं काम केलं आहे. सरकारबद्दल लोकांच्या मनात सहानभुती आहे. आता जरांगे पाटील यांनी माघार घेतल्यामुळे कोणाला फायदा झाला हे विधानसभेच्या निवडणुकीनंतरच कळेल असं रावसाहेब  दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.