शिंदे गटाच्या विरोधात भाजप आक्रमक, “हे” आहेत कारण…
गिरीश महाजन यांच्या ऐवजी पालकमंत्री दादा भुसे यांची नियुक्ती होताच भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
नाशिक : शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपमध्ये (BJP) वादाला तोंड फुटले आहे. याचे कारण ठरले आहे नाशिक महानगर पालिकेतील (NMC) वर्चस्ववाद. पालकमंत्री पद हे भाजपच्या ताब्यात असेल आणि पालकमंत्री गिरीश महाजन होतील अशी शक्यता असताना शिंदे गटाकडे नाशिकचे पालकमंत्री पद गेले आणि दादा भुसे हे पालकमंत्री झाले. यावर नाराज असलेल्या भाजपच्या आमदारांना पालिकेत झालेल्या बैठकीला न बोलवल्याचे समोर आले होते. पालकमंत्री झाल्यानंतर दादा भुसे यांनी आढावा घेत असतांना पालिकेत आढावा बैठक घेतली होती. त्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित देखील आयोजित करण्यात आली होती ती काही कारणास्तव झाली नाही मात्र त्याही बैठकीला भाजप आमदारांना बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे शिंदे गटाच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी दंड थोपटले असून वरिष्ठांकडे तक्रार केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
गिरीश महाजन यांच्या ऐवजी पालकमंत्री दादा भुसे यांची नियुक्ती होताच भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर दादा भुसे यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकी नंतर नाशिक महानगर पालिकेची देखील आढावा बैठक घेतली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मुंबईत येथे नाशिक महानगर पालिकेच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र, ही बैठक झाली नसली तरी या बैठकीला शहरातील तिन्ही भाजपच्या आमदारांना बोलावण्यात आले नसल्याचे समोर आले.
त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्या या भूमिकेवर भाजपच्या तिन्ही आमदारांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वर्चस्वाच्या लढाईवरून हा वाद निर्माण झाला असून शिंदे गट भाजपला शह देतोय का ? अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाली आहे.
राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर कुठे तरी गाडी रुळावर येत असतांना नाशिकमधून शिंदे गट आणि भाजपमधील ही धुसफूस समोर आली आहे.
त्यामुळे येत्या काळात नाशिक महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतांना भाजप आणि शिंदे गटातील हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.