‘चिंगम‘ संजय राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये – भाजप नेत्याचा पलटवार

दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक, दोघेही निवडणुकीच्या तयारासाठी लागले आहेत. याचदरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांनाही धार चढली असून सत्ताधारी असोत किंवा विरोधक, एकमेकांन लक्ष्य करण्याची, बोट दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

‘चिंगम‘ संजय राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये - भाजप नेत्याचा पलटवार
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना सुनावलं
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 11:59 AM

राज्यातील विधानसभा निवडणुकांचं शिंग आता कधीही फुंकलं जाऊ शकतं. निवडणुकांची घोषणा द्याप झाली नसली तरी दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक, दोघेही निवडणुकीच्या तयारासाठी लागले असून जागांची विभागणी, दौरे, मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विविध योजनांची घोषणंची बरसात, असे कार्यक्रम सुरू आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांनाही धार चढली असून सत्ताधारी असोत किंवा विरोधक, एकमेकांन लक्ष्य करण्याची, बोट दाखवण्याची एकहीसंधी सोडत नाहीत.

बदलापूरच्या शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचं झालेल एन्काऊंट हा सध्या राज्यातील ज्वलंत मुद्दा असून त्यावरून विरोधकांनी सरकाराला धारेवर धरले. सामनाच्या अग्रलेखातून आजा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला. सिंघम मुख्यमंत्री अशी त्यांची खिल्ली उडवत फडणवीसांवर टीका करण्यात आली. मात्र हे सत्ताधारी भाजप नेत्यांना फारसे रुचले नसून आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये, अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार ?

‘एक्स’ या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट करत राऊत यांना सुनावलं आहे. ” महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे. ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो.” असे दरेकर यांनी सुनावलं.

‘ देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्रजी फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलंच. पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.’

‘देवेंद्रजी फडणवीस हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या ‘नालायका‘च्या सर्टिफिकेटची गरज नाही’ असे म्हणत दरेकर यांनी राऊत यांना फटकारलं.

सामनातून करण्यात आली होती टीका

बदलापूरमधील आरोपीच्या एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध बॅनर्सही लावण्यात आले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा हातात बंदूक घेतलेला फोटो होता. तसेच ‘बदला पुरा’, “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार” अशा आशयाचे काही बॅनर्स संपूर्ण मुंबईत तसेच वांद्रे येथील कलानगर परिसरातही झळकले. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही याच मुद्यावरून सरकारला खडे बोल सुनावण्यात आले होते.

या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.