आ.गणपत गायकवाड यांची पत्नी मतदारसंघात सक्रीय, राजकीय चर्चांना उधाण, महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर या प्रकणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. पण गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा राजकीय वर्तुळात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई | 3 मार्च 2024 : उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर या प्रकणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. पण असं असलं तरी गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा राजकीय वर्तुळात सक्रिय झाल्या आहेत. सुलभा गायकवाड कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
महिन्यभरापूर्वी उल्हासनगर गोळीबारामुळे हादरलं होतं. शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेत गंबीर जखमी झालेल महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. तर गोळीबाराच्या या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड आणि इतर आरोपींना पोलिसानी अटक केली. सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. तर गायकवाड यांचा मुलगा वैभव अद्याप फरार आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. मात्र भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या मैदानात उतरल्याचे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार गायकवाड यांच्या निधीतून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन आता यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड याच्या हस्ते करण्यात येत आहे.
हेश गायकवाड यांच्या चिंचपाडा परिसरातील कार्यालया बाहेर विकास कामाचे भूमीपूजन करत शक्ती प्रदर्शन
त्यांनी शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या चिंचपाडा परिसरातील जनसंपर्क कार्यालया बाहेर विकास कामाचे भूमीपूजन करत शक्ती प्रदर्शनही केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांचे जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार गायकवाडांच्या पत्नीच्या राजकीय एन्ट्रीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.