‘देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व खुपतय… ‘, गोपीचंद पडळकर यांची नेमकी टीका काय?

आम्हाला कुणाचाही पक्ष फोडण्याची गरज नाही. अडीच वर्ष आमची सत्ता नसताना भाजपचा एकही आमदार फुटला नाही. आपली सत्ता गेली यामुळे काही लोक बिथरली आहे. त्यामुळेच राज्यात काही वेगळे प्रयोग केले जात आहेत.

'देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व खुपतय... ', गोपीचंद पडळकर यांची नेमकी टीका काय?
MLA GOPICHAND PADALKARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 11:22 PM

पुणे : 7 सप्टेंबर 2023 | जालना येथे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसले आहेत. तर अनेक कार्यकर्ते तेथे ठाण मांडली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यातील अनेक जिल्ह्यात उमटत आहेत. दुसरीकडे राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने दोन वेळा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. राज्य सरकारने कुणबी बाबतचा जीआरही काढला. पण, मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राज्यातील एका जेष्ठ पुढाऱ्याला सारखं खुपतय, अशी टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना गायकवाड समितीचा अहवाल तयार केला. त्याआधारे मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण टिकले नाही. आघाडी सरकार त्यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणावर कुणी काही बोलले नाही. पण, राज्यात पुन्हा युतीचे सरकार आल्यावर आता कोर्टाच्या तारखा सुरू झाल्यात. सरकार त्याचा पाठपुरावा करत आहेत असे आमदार पडळकर म्हणाले.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. पण, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी अडीच वर्षात काय दिवे लावले ते महाराष्ट्राला माहित आहे. त्यांनी एकतरी निर्णय घेतला का. उलट कोरोना मृतांच्या बॅगांमध्ये भष्ट्राचार केला अशी टीका पडळकर यांनी केली.

हे सुद्धा वाचा

भाजपची अडीच वर्षे राज्यात सत्ता नव्हती. असे असतानाही आमच्या एकाही आमदाराला दुसऱ्या पक्षात जावे असे वाटलं नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप करत आहेत. पण, तेच विजय वडेट्टीवार उद्या कुठल्या पक्षात असतील हे ते पण सांगू शकणार नाहीत. भाजपला कुणाचेही घरं फोडण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटत राहावं असं काही लोकांना वाटत आहे, त्यांचा तसा प्रयत्न सुरु आहे. सत्ता गेल्यानंतर काही लोकं बिथरले आहेत. त्यामुळेच असे काहीतरी प्रयोग राज्यात केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राज्यातील एका जेष्ठ पुढाऱ्याला सारखं खुपतय, अशी टीका आमदार पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.