सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे, मात्र या सर्व धामधुमीत मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे, त्यांनी यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र देखील लिहीलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये कोटेचा यांनी केला आहे. विरोधकांकडून जीवाला धोका असल्याचा संशय मिहीर कोटेचा यांना आहे. सुरक्षेचा भंग करून जीवाला हानी करण्याचा प्रयत्न तिघांनी केला, असं कोटेचा यांनी म्हटलं आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
आपल्या जीवाला धोका असल्याचं मिहीर कोटेचा यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला एक पत्र लिहीलं आहे. यामध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख कोटेचा यांनी केला आहे. विरोधकांकडून जीवाला धोका असल्याचा कोटेचा यांचा आरोप आहे. सुरक्षेचा भंग करून जीवाला हानी करण्याचा प्रयत्न तिघांनी केला, असं कोटेचा यांनी म्हटलं आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान या पत्रावर प्रतिक्रिया देताना मिहीर कोटेचा यांनी म्हटलं की, मी मुलुंडच्या एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे माझी प्रवाशी कार्यकर्त्यांसोबत भेट होती. त्यांच्यासोबत जेवण करायचं होतं, मात्र या भेटीची माहिती कोणालाही नव्हती. मात्र जेवन सुरू असताना तीथे तीन अज्ञान व्यक्ती घुसस् आणि हॉटेलच्या स्टापला सांगितलं की, माझं नाव नितीन भाई आहे मिहीर कोटेचा यांनी आम्हाला बोलावं आहे, त्यांच्या भेटीसाठी आम्हाला सोडा. हॉटेलच्या स्टापने माझ्याशी संपर्क केला. मी त्यांना सांगितलं की मी कोणत्याही नितीन भाईला ओळखत नाही आणि मी कोणालाही बोलावलं नाही. त्यामुळे माझ्या मनात शंका आली आणि धक्काही बसला. हॉटेलमधील भेटीबाबत कोणालाही माहिती नसताना हे हॉटेलमध्ये घुसले कसे? असं कोटेचा यांनी म्हटलं आहे.