Nitesh Rane: राऊतांसारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं?; नितेश राणेंचा सवाल
भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांच्या सारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे.
मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांच्या सारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. 2014ला ईडीच्या (ED) कारवाया त्यांना व्यवस्थित वाटत होत्या. आज त्यांच्यावर कारवाई होत आहे, तर टीका सुरू आहे. प्रवीण राऊतांची चार्जशीट तयार झाल्याने हा भोंगा असाच वाजत राहणार. रोज सकाळी राष्ट्रवादीच्या या भोंग्याचा आवाज ऐकायचा का? याचा आता आपणच विचार केला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले. शिवसेनेने दुसऱ्याला बी टीम, सी टीम बोलू नये. उलट इतरांना नावं ठेवताना शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. शिवसेना राष्ट्रवादीची बी टीम झाली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हा हल्लाबोल केला.
भाजप हा हिंदुत्वाला मोठं करणारा एकमेव पक्ष आहे. हे वारंवार सिद्ध झालं आहे. मोदींच्या नेतृत्वात देशभरात हिंदुत्वाची लाट आलेली आहे. हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश पुढे जात आहे. भाजपच्या विचारसरणीला पकडून कोणी येत असेल, हिंदुत्वाची भूमिका मांडत असेल तर त्याचं स्वागत करू. राज ठाकरेंची भूमिका हिंदुत्वाची असेल तर त्यांचं स्वागतच करू. शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळसााहेबांचा विचार संपवत असेल, पक्षाची ओळख मिटवत असतील, तर, बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात असेल तर त्यांचं स्वागत आहे. बाळासाहेबांचे विचार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन संपवला जात असेल तर आम्हाला ते बघवणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.
भाजप नेत्यांना अडकवण्यासाठीच गृहखाते हवे
शिवसेना गृहखात्यासाठी आग्रही होती. गृहखातं कशाला तर भाजपच्या नेत्यांना अडकवण्यासाठी. कायदा आणि सुव्यवस्था नीट करण्यासाठी नाही. महिला अत्याचार रोखण्यासाठी नाही. वसुलीकांड कमी करण्यासाठी नाही. भाजपच्या नेत्यांवर कारवाई होत नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई होत आहे. प्रवीण दरेकरांवर कारवाई होत आहे हा त्याचाच एक भाग आहे, असा दावा त्यांनी केला.
सर्वांचे सीडीआर तपासा
अनुभवाने सांगतो. पोलीस कुणाच्या तरी आदेशावर काम करतात. दरेकरांना बोलावलं हे कोणाच्या तरी आदेशावरूनच. आम्ही मालवणी पोलीस ठाण्यात असताना डीसीपीला दर पंधरा मिनिटाने कुणाचे तरी फोन येत होते. आजही संबंधित तपास अधिकारी आहे, डीसीपीचे सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजेत. त्यांना कोण फोन करतो आणि त्याला कोण आदेश देतंय हे पाहिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरेकरांची चौकशी कुणाच्या तरी आदेशावर
आज दरेकरांची चौकशी ही कुणाच्यातरी आदेशावर होते. नाहक त्रास देणं, विरोधकांचा आवाज दाबणं हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. पण आम्ही सर्व दरेकरांच्या पाठी खंबीरपणे आहोत. भाजप त्यांच्यासोबत आहे. मी स्वत: पोलीस ठाण्यात जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात, खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी अॅडमिट
Nawab Malik : नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ, मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवली
CP Sanjay Pandey : एका ट्विटवर मुंबई पोलीसांची कडक कारवाई, सीनिअर