‘या’ आमदाराने काढली राऊत यांच्या कुटुंबाची कपॅसिटी, म्हणाले ‘कशात तर…’

देवेंद्र फडणवीस यांनी काय निर्णय घ्यावा हे सांगण्याइतका मी मोठा नाही. पण, राज्यात तीन मोठे नेते एकत्रित येऊन चांगले काम करत आहेत. त्यांना काम करू द्या. कुणीही उगाच बडबड करू नये.

'या' आमदाराने काढली राऊत यांच्या कुटुंबाची कपॅसिटी, म्हणाले 'कशात तर...'
SANJAY RAUT, SUPRIYA SULE, SANJAY SHIRSATA, NITESH RANEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 7:40 PM

सिंधुदुर्ग : 9 ऑक्टोबर 2023 | मराठा समाजाला एकत्र करण्याचे काम जरांगे पाटील यांनी करावं समाज हितासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. उबाटा गटाकडे स्वतःचं चिन्ह नाही. त्यांना चौकटीच्या बाहेर कोण ओळखत नाही. बाळासाहेब तुझे ही विठ्ठल होते मग त्यांचं घर का फोडलं असा जळजळीत सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना केला. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भांडण लावून दिले. पवार साहेबांसोबत देखील तेच केले. बाळासाहेब ठाकरे यांनी ह्याला सगळं दिल मग त्याचं घर का फोडलं? असा थेट प्रश्न त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस साहेबांची लायकीबद्धल राऊत बोलला. कोणी कोणाची लायकी काढली आणि कोण बोललं तर चालेल का? रश्मी ठाकरेंना सामनाचा संपादक बनवून राऊतची लायकी काढली असं बोललं तर चालेल का? साधा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची लायकी नाही तो मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघतो. उद्धव ठाकरेंनी याची लायकी ओळखली आणि त्याला सत्तेच्या काळात राज्य मंत्री पण बनवले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राजाराम राऊत यांच्या कुटुंबात खूप कपॅसिटी आहे. कशात तर खिचडी चोरीसाठी. ह्यासाठी त्यांना मानलं पाहिजे. स्वतःची लायकी बघ आणि मग फडणवीस साहेबांवर बोल. तुझ्या मालकाची लायकी नसताना फडणवीस साहेबांनी त्याचे फार लाड केले. तुझं स्क्रिप्ट कोण लिहीते. मातोश्री, सिल्वर ओक की 10 जनपथ. राऊत याची लायकी नसल्यामुळेच त्याला बाजूला केलं. तशीच फडणवीस साहेबांवर बोलण्याची तुझी लायकी नाही, असे नितेश राणे म्हणाले.

शिंदे साहेबांना किती त्रास द्यायचा हे आमच्या मित्र पक्षाने ठरवावे. फडणवीस साहेबांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांना सांगण्याइतके आपण मोठे नाही. पण, देवेन्द्रजी, अजितदादा आणि मुख्यमंत्री शिंदे या तिघांना काम करू द्या. उगाच बडबड करू नका आणि राऊतला fultos देऊ नका, असा सल्ला त्यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना दिला.

उबाटा सेनेने आपल्या याचिका मागे घ्याव्या. जोपर्यंत यांची याचिका आहे तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत. त्यांनी कोणताही उमेदवार दिल्या. जाहीर केल्या तरी लोकसभेत खासदार हा भाजपचाच निवडून येणार. सुप्रिया ताईं यांनी सरकारवर टीका करण्यात जेवढा वेळ दिला तितका वेळ कोरोना काळात मास मर्डर करणारे उद्धव ठाकरे यांना समजवण्यासाठी दिला असता तर लोक वाचली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.