Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे हा नमकहराम माणूस’, भाजपा आमदाराने वापरले जिव्हारी लागणारे शब्द

Uddhav Thackeray | "उद्धव ठाकरे यांना बाप म्हणून कळून चुकलय की, माझ्या मुलाची दिवाळी आर्थररोड कारागृहात साजरी होणार. तो राग, ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर काढतायत"

Uddhav Thackeray | 'उद्धव ठाकरे हा नमकहराम माणूस', भाजपा आमदाराने वापरले जिव्हारी लागणारे शब्द
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 10:56 AM

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर मस्टर मंत्री अशी टीका केली होती. त्यावर आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जिव्हारी लागणारे शब्द वापरले. देवेंद्र फडणवीस हे मस्टर मंत्री असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.

“उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी औरंग्याच्या विचारसरणीची आहे. उद्धव ठाकरे हा नमकहराम माणूस आहे. जो स्वत:च्या वडिलांचा, धर्माचा, सख्ख्या भावाचा झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 दरम्यान उद्धव ठाकरे यांचे सख्ख्या भावापेक्षा पण जास्त लाड पुरवले. त्यांना उद्धव ठाकरे नाव ठेवत असेल, तर याच्यापेक्षा नमकहराम कोणी होऊ शकत नाही” असं नितेश राणे म्हणाले.

‘माझ्या मुलाची दिवाळी आर्थररोड कारागृहात साजरी होणार’

“उद्धव ठाकरे यांचं मूळ दुखण देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा नाही. मागच्या दोन-तीन दिवसांपासून कारवाया सुरु आहेत. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कारवाई झाली. उद्धव ठाकरे यांना बाप म्हणून कळून चुकलय की, माझ्या मुलाची दिवाळी आर्थररोड कारागृहात साजरी होणार. तो राग, ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर काढतायत” असा दावा नितेश राणे यांनी केलाय.

‘ती 2-3 वर्षांची लहान मुलं आहेत का?’

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मस्टर मंत्री म्हणून टीका केली. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे मस्टर लिहिण्याच्या लायकीचे राहिले आहेत का? तुम्ही तुमची बौद्धि पात्रता दाखवताय” एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावरुन केलेल्या टीकेवर नितेश राणे म्हणाले की, “ती 2-3 वर्षांची लहान मुलं आहेत का? आम्ही कोणाच्या दारात जात नाही. ते आमच्याकडे आले. उद्धव ठाकरे, मविआ बरोबर त्यांना भविष्य दिसलं नाही. म्हणून ते आमच्याकडे आले. आम्ही सगळ्या देशाचा विचार करुन, हिंदुत्व भक्कम करण्यासाठी जनतेच्या विकासासाठी हा निर्णय घेतला”

‘मग मी मानतो तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात’

अख्खा भाजपा समोर उभा राहिला, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेला संपवू शकत नाही, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरही नितेश राणे यांनी टीका केली. “स्वत: मुख्यमंत्री असताना, बाळासाहेबांच नाव लावायला लाज वाटायची. बॅनरवर बाळासाहेबांचे फोटो नसायचे. तुम्ही इंडियाची बैठक मुंबईत घेताय ना, तुम्ही आणि तुमचा कामगार संजय राऊत ज्या राहुल गांधींची चाटण्याच काम करतो, त्या राहुल गांधींना शिवतीर्थावर आणून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करायला लावा, मग मी मानतो तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहात” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.