Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suresh Dhas : बकरे की मां कब तक दुवा मांगेगी… सुरेश धस यांचा बीड प्रकरणावरून संकेत काय?

मी पत्र देताना एसपीचा उल्लेख केला होता. पण साहेबांनी डायरेक्ट आयजीकडेच तपास दिला आहे. त्यामुळे जोरात तपास सुरू आहे. बकरे की माँ कब तक दुवा मांगेगी असं म्हणतात तसं ही बकरी कुठंपर्यंत जाईल हे थोड्या दिवसात कळेल

Suresh Dhas : बकरे की मां कब तक  दुवा मांगेगी... सुरेश धस यांचा बीड प्रकरणावरून संकेत काय?
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 1:21 PM

बीडमधील मस्सोजगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यात वातावरण तापलेलं असून दोन दिवसांनी बीडमध्ये मूक मोर्चाचेही आयोजन करण्यात आलं आहे. आता याच प्रकरणावरून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मास्टरमाईंड असणारा आका सुटणार नाही असं बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. बकरे की माँ कब तक दुवा मांगेगी असं म्हणतात, तसं ही बकरी कुठंपर्यंत जाईल हे थोड्या दिवसात कळेल. आका कितीही पळाला तरीही तो पकडला जाईलच असंही सुरेश धस टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाले. ‘ पोलीस तपास सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरला आहे. मी कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे यातील मास्टरमाइंड मी ज्याला आका म्हणतो तो सुटणार नाही. तो कितीही पळाला तरी तो पकडला जाईल’ अशी आम्हाला खात्री आहे, असं धस यांनी नमूद केलं.

यापूर्वी बोलताना सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे असा मोठा आरोप केला होता. बीडमध्ये कायदा-सुव्यस्था आहे की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानावरूनही बराच गदारोळ माजला होता. मात्र आज टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या घटनेचा मास्टरमाईंड लवकरात वकर पकडला जाईल असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले सुरेस धस ?

पोलीस तपास सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरला आहे. मी कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे यातील मास्टरमाइंड मी ज्याला आका म्हणतो तो सुटणार नाही. तो कितीही पळाला तरी तो पकडला जाईल. मी सभागृहात मागणी केली होती. एसआयटी स्थापन केली होती. मी पत्र देताना एसपीचा उल्लेख केला होता. पण साहेबांनी डायरेक्ट आयजीकडेच तपास दिला आहे. त्यामुळे जोरात तपास सुरू आहे. बकरे की माँ कब तक दुवा मांगेगी असं म्हणतात तसं ही बकरी कुठंपर्यंत जाईल हे थोड्या दिवसात कळेल. विशेषत: आम्ही व्यक्तिगत म्हटलं तर, सरकारी वकिलाची नेमणूक करणं असो, एसआयटी स्थापन करणं असो, त्या कुटुंबाला दहा लाखाची मदत करणं असो याबाबत समाधानी आहोत. पण माझं मत आहे की हा आका लवकरात लवकर पकडला जावा. पोलीस पकडतील. स्कॉटलँड यार्ड नंतर आपली ख्याती आहे, त्यामुळे पोलिसांनी पटकन शिताफी दाखवावी असं सुरेश धस म्हणाले.

जे एसपी आकाच्या इशाऱ्यावर चालत होते…

जे एसपी आकाच्या इशाऱ्यावर चालत होते, मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात त्यांची हकालपट्टी केली आहे, आता नवीन एसपी दिले आहेत. एसपी आणि सीआयडीची एसआयटी चौकशी करत आहे. आका पकडला जाईल असं आम्हाला वाटतं. आका पकडल्यावर आकाच्या आकाचा काही संबंध आहे का हे दिसून येईल, असं त्यांनी नमूद केलं.

मी आता नाव घेणार नाही. आकाच्या आदेशापर्यंत होऊ शकत नाही. आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर आहे. विष्णू चाटेच आदेश देत होता. विष्णू चाटे आदेश देत असताना आकाशी बोलत होता. त्याला कसं मारतोय, कसं क्रुरतेने मारतोय हे व्हिडीओ कॉल करून दाखवलं आहे. हे आकाला आणि विष्णू चाटेलाही दाखवलं असेल, हे मला शंभर टक्के वाटतं, असा आरोप त्यांनी केला. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. माझं स्टेटमेंट हे झालं आहे. भीती बिती, दहशत आणि यांच्या आकाला मी घाबरत नसल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं.

कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.