Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे प्रकरण ए पासून झेडपर्यंत लढण्याची आपली तयारी, काय म्हणाले सुरेश धस ?

आपण धनंजय मुंडे यांची माणूसकीच्या नात्याने शासकीय विश्रामस्थानी भेट घेतली होती. आमचे प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवल्याने जाणे मला भाग पडले ही भेट केवळ २० ते ३० मिनिटे झाली होती, त्यास ४ तास का म्हटले गेले हे बावणकुळे यांनाच विचारा असा पुनरुच्चार सुरेश धस यांनी यावेळी केला.

हे प्रकरण ए पासून झेडपर्यंत लढण्याची आपली तयारी, काय म्हणाले सुरेश धस ?
Follow us
| Updated on: Feb 18, 2025 | 4:47 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरण लावून धरणारे भाजपाचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मु्ंडे यांची भेट घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विश्वासार्हतेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. त्यावर आज पुन्हा एकदा सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण धनंजय मुंडे यांची माणूसकीच्या नात्याने शासकीय विश्रामस्थानी भेट घेतली होती. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवल्याने जाणे मला भाग पडले. आमची भेट रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास झाली, ती देखील २० ते ३० मिनिटे होती. आता त्यांच्या बोलण्याच्या ओघात चार तास कुटुन आले ते तुम्ही त्यांनाच विचारा..रात्री साडे नऊ वाजता भेटणे ही काही गुप्त भेट होऊ शकत नाही. लोक रात्री दोन- दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्‍यांना भेटत असतात असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.

आपण ओपन एअर थिएटर आहे

माझ्या नेत्याने म्हणजे प्रदेशाध्यक्षाने आदेश दिल्यानंतर मी तेथे जाणे भाग होते. मुंडे यांच्या काही तरी ऑपरेशन झाले होते. म्हणून मी माणूसकीच्या नात्यातून त्यांना भेटायला गेलो. तेथे देखील मी नमते घेणार नाही असे म्हणाल्याचे बावणकुळे यांनी सांगितलेले आहे. तुम्ही माझ्या विश्वासार्हतेबाबत विचारायचे असेल बीड-परळीच्या जनतेला विचारा.. धनंजय देशमुख यांना विचारा त्यांनी जर सांगितले मी विश्वासार्ह नाही तर मी मानेल असेही आवाहन सुरेश धस यांनी यावेळी दिले. आपण ओपन एअर थिएटर आहे , आका बाका कोणी मला काय करु शकणार नाही. मला आधीही कधी संरक्षण नव्हेत आताही नाही असेही सुरेश धस यांनी यावेळी सांगितले. हे प्रकरण ‘ए पासून झेड’ पर्यंत लढण्याची आपली तयारी आहे असेही ते म्हणाले.

सगळे घोटाळे २० तारखेला बाहेर काढणार

श्रीकर परदेशी साहेबांना सांगून मी पोलिस महासंचालक मॅडमना देखील भेटून आलो आहे.कृषी आयुक्तांना पत्र दिले, रस्तोगी साहेबांना देखील पत्र दिले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवले गेले आहे, उद्या शिवजयंतीचा दिन म्हणून थांबलो आहे. आपण नंतर कृषी साहित्याचे दर देखील सांगणार आहोत कशी फसणवूक झाली ते देखील सांगणार आहोत. २० तारखेला सर्व सांगणार आहे. चार अधिकारी कसे बदलेले आहेत. त्यांची नावे काय आहेत. अजित पवार डीपीसीचे ७३ कोटी रुपये बोगस कसे उचलेले तेव्हा शर्मा नावाचे प्रशासकीय अधिकारी होते. आपण परळी नगरपरिषदेचे ऑडिट लावण्याची मागणी केली आहे,  ही सर्व माहिती आपण देणार असून दोन दिवस थोडं थांबा असेही सुरेश धस यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कृष्णा आंधळे हे कोकरु फरार आहे

आतापर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नऊ आरोपी ३०२ मध्ये आत गेले आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी कोणी किती मोठा असो त्यांच्यावर कारवाई करणार असे आश्वासन बीड येथे येऊन दिलेले आहे. कृष्णा आंधळे हे कोकरु फरार आहे ते सापडेल असेही भाजपा आमदार सुरेस धस यांनी यावेळी सांगितले. संतोष देशमुख यांना कळंब येथे उचलून न्यायचे होते. तेथे एक महिला तयार ठेवली होती. तिच्या बरोबर झटापट केली असे दाखवायचे होते. गावाच्या अलिकडेच संतोष देशमुख यांचा अंत झाला असेही सुरेश धस पुन्हा यावेळी म्हणाले.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.