राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याच्या विधानावर अनिल बोंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, काँग्रेसला…
Anil Bonde Statement About Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याबाबतच्या विधानावर अनिल बोंडे ठाम आहेत. काँग्रेसला जाब विचारला पाहिजे, असं अनिल बोंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे. तसंच नाना पटोले यांचं नाव घेत अनिल बोंडे यांनी वक्तव्य केलं आहे. वाचा सविस्तर...
काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना आरक्षणाबाबत विधान केलं. जे प्रचंड चर्चेत राहिलं. काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याबाबात विचार करत आहे. पण योग्यवेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पण सध्या भारतात तशी परिस्थिती नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला महायुतीकडून कडाडून विरोध केला जात आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल, असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं. त्यानंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींची जीभ छाटायला नको तर त्याला चटके द्यायला हवेत, असं विधान केलं होतं. त्यावर आता बोंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राहुल गांधीबाबतच्या विधानावर ठाम
राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याबाबत केलेल्या विधानाववर अनिल बोंडे ठाम आहेत. राहुल गांधी यांची क्लिप व्यवस्थित पाहा… सगळ्या काँग्रेसने मेल करून जाब विचारला पाहिजे. ज्या समाजात मी राहतो त्या समाजात एखादा मुलगा आपल्या समाजाची बदनामी करत असेल तर त्याची आई सवय मोडण्यासाठी चटके देते अस म्हणते. तो वाक्प्रचार आहे. मी वऱ्हाडी बोलीत केलेल्या स्टेटमेंट वर आजही ठाम आहे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींनी माफी मागावी- बोंडे
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण का आंदोलन करत आहात ते तर सांगा ना… अमेरिकेत जाऊन यु टर्न मारायचा ही यांची पद्धत आहे. अलिगढ आणि तर काही विद्यापीठात एससी- एसटी आरक्षण नाही. यांना फक्त अल्पसंख्याक समाजाचं हित पाहायचं आहे. यांना फक्त मुस्लिम आणि ख्रिचन समाजाचं हित बघायचं आहे. खरा गुन्हा राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झाला पाहिजे. राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे. यशोमती ठाकूर यांनी सीपींसमोर जी भाषा वापरली ती पाहा. शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं पाहिजे, असंही अनिल बोंडे म्हणालेत.
नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी नेहमीच निर्णय घेतात. सोयाबीन, सरकी यांच्या भावात वाढ झाली आहे. काल प्रधानमंत्री आशा अंतर्गत महत्वाचं निर्णय घेतला. भारत हा तेलासाठी परावलंबित्व असलेला देश आहे. मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे आगामी काळात कांद्याचे भाव वाढतील.आज देखील लासलगाव आणि इतर बाजारात कांद्याच्या किमती वाढल्या आहेत. सोयाबीन, धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, असं बोंडे म्हणाले.