मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी मुंबईच्या अमराठी खासदाराचा संसदेत प्रस्ताव
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल आणि केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांना पत्र लिहिलं आहे
मुंबई : पुढील महाराष्ट्र दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार, असा संकल्प भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. गोपाळ शेट्टी या अमराठी आणि एकमेव खासदाराने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी संसदेत प्रस्ताव सादर केला होता. (BJP MP Gopal Shetty writes letter for The status of Classical language status to Marathi)
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल आणि केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांना पत्र लिहिलं आहे. यानंतर आता केंद्र पातळीवर नव्याने तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
मराठीला भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासंदर्भात ही महत्त्वाची घडामोड आहे. आधीच्या त्रिसदस्यीय समितीपैकी एकाचे निधन झाले, तर एक जण निवृत्त झाल्याने प्रकरण लांबणीवर पडले होते.
गोपाळ शेट्टींनी 2017 मध्ये हा मुद्दा लोकसभेत लावून धरला होता. त्यानंतर यावर अभ्यास करण्यासाठी हा विषय तज्ञ समितीकडे देण्यात आला होता. विविध कारणामुळे ही समिती बरखास्त झाली होती.
यासंदर्भात असलेल्या न्यायालयीन अडचणी दूर झाल्या आहेत. केंद्र सरकारने इतरही राज्याकडून त्यांच्या भाषांसंदर्भात प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकर मार्गी लागणार असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.
कोण आहेत गोपाळ शेट्टी?
गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. त्यांनी अभिनेत्री काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना पराभवाची धूळ चारली होती. तब्बल 4 लाख 65 हजार 247 चे मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते. (BJP MP Gopal Shetty writes letter for The status of Classical language to Marathi)
शेट्टी सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत. याआधी दोन वेळा त्यांनी आमदारकी भूषवली आहे. तर भाजप मुंबईचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. मात्र केंद्रात मंत्रिपद घेण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
पुण्यातील ‘परिवर्तन’ या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून खासदारांचं रिपोर्ट कार्ड काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. त्यात विधेयकांच्या बाबतीत भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला होता.
मुश्रीफांना प्रशासक नेमण्याची घाई, फडणवीसांचा जोरदार आक्षेप, ग्रामपंचायत सुधारणा विधेयक गदारोळात मंजूर https://t.co/n7KEqMomll @mrhasanmushrif @Dev_Fadnavis #विधिमंडळ_पावसाळी_अधिवेशन
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
संबंधित बातम्या :
मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा, खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात ‘नको!’
(BJP MP Gopal Shetty writes letter for The status of Classical language to Marathi)