भाजपचा खासदार आंदोलन करत म्हणाला, राष्ट्रवादीचे बारा वाजविल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही
चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
चाळीसगाव : आज संपूर्ण राज्यभर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतिने राज्यभर आंदोलने करण्यात आली आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत असतांना थेट राष्ट्रावादी कॉँग्रेसचे बारा वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असे म्हणत थेट अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केले होते. त्यावरून संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापले असून अजित पवार यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यावेळी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून ठिकठिकाणी भाजपच्या नेत्यांनी आंदोलन करत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे यांच्याबदल अजित पवार यांनी केलेल विधानावरुन भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीचे बारा वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत राहणार नाही असा दावा केला आहे.
विरोधी पक्षनेते हे गरिमा असलेल पदे आहे, त्या पदाचा अजित पवारांनी अपमान केला असून त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा अशी मागणी उन्मेष पाटील यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या विरोधात भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी ही मागणी केली असून अजित पवार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्थ असल्याचे उन्मेश पाटील म्हणाले आहे.
एका बाजूला प्रश्न उपस्थित करायचा तर दुसऱ्या बाजूला महापुरुषांचा अपमान करायचा, अजित पवारांनी महापुरुषांचा राजकारणापुरता उल्लेख केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
अंतर्मनातून जर महापुरुषांविषयी अजित पवारांची भक्ती असती तर अजित पवारांनी असं वक्तव्य केलं नसतं असा टोला यावेळी पाटील यांनी लगावला आहे.