भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महिनाभरातच पुन्हा महराष्ट्रात येणार, ‘या’ जिल्ह्यात घेणार मोठी जाहीर सभा
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून त्याच अनुषंगाने नड्डा यांची भोसरी येथे सभा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी उमेदवार कोण असेल याबाबत देखील आता चर्चा होऊ लागली आहे.
पुणे : महिनाभरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या दौऱ्यातही ते आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेत राजकीय वातावरण तापवत आहे. नुकताच औरंगाबाद दौऱ्यावर आलेले जे पी नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यामध्ये औरंगाबादचा दौरा करून जे पी नड्डा यांची पाठ फिरत नाही तोच पुन्हा महाराष्ट्र दौरा आलेला आहे. याबाबत पुण्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आजी-माजी खासदार नसलेल्या मतदार संघात जे पी नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात असून उमेदवारांची चाचपणी याशिवाय जिथे उमेदवार नाही तिथे भाजप आपली ताकद लावत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे.
भाजप आणि सेना आणि यांच्या विरुद्ध कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या युतीत कधीकाळी थेट लढत होणाऱ्या शिरूर मतदार संघात जे पी नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे.
शिरूर मतदार संघात मागील काही पंचवार्षिक निवडणुकीत शिवसनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होते.
त्यांचा पराभव करून अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.
त्यामुळे जयठिकाणी भाजपचा आजी माजी खासदार नसतांनाही जे पी नड्डा यांचा दौरा होत असल्याने नड्डा यांचा पुणे दौरा चर्चेचा विषय ठरणार आहे.
20 जानेवारीला जे पी नड्डा पुण्यात येणार आहे, पुण्यातील शिरूर मतदार संघात जे पी नड्डा यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून त्याच अनुषंगाने नड्डा यांची भोसरी येथे सभा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी उमेदवार कोण असेल याबाबत देखील आता चर्चा होऊ लागली आहे.